Posts

Showing posts from 2020

वाचावीत अशी पुस्तके - भाग -१ ......

   छत्रपती शिवाजी महाराज - चरित्र छत्रपती संभाजी महाराज - चरित्र महात्मा फुले  -चरित्र डॉ बाबासाहेब आंबेडकर -  चरित्र नेपोलियन बोनापार्ट  पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. अब्दुल कलाम  स्वामी विवेकानंद कार्ल मार्क्स मार्टिन ल्युथर किंग  डॉ.नेल्सन मंडेला  सुभाषचंद्र बोस  _________________  The first 20 hours  How to think like Leonardo da Vinci  How to win friends and influence people Ikigai Jugar innovation Made to stick Million dollar habits Rework Retire young retire rich  The 4 hours work week The 48 laws of power The millionaire fast lane The power of habit The richest man in Babylon The tatas  Think and grow rich  Start with why  The 7 habits of highly effective people  Personal MBA  Zero to one  Lean in  Chanakya niti  Deep work  Rich dad poor dad  The 80/20 formula  The art of public speaking  _________________________________ Big magic  Emotional intelligence ...

मजेत जगा आणि आनंदाने काम करा .. .

Image
How to enjoy your life and your job ...               या पुस्तकाचा मराठी अनुवाद.  मजेत जगा आणि आनंदाने काम करा. लेखक - डेल कार्नेगी मजेत जगा आणि आनंदाने काम करा. हे पुस्तक  गृहिणी पासून ते अब्जाधीश लोकांच्या प्रोत्साहित करणाऱ्या गोष्टी सांगते . या पुस्तकांमध्ये सामान्य घरातील लोक ते थेट अब्जाधीश अशा लोकांच्या गोष्टी , अनुभव त्यांच्या आयुष्यात आलेल्या समस्या , नैराश्य त्यांना आलेला  थकवा आणि कंटाळा यावर यावर या लोकांनी कसा विजय या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल . या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत. पहिल्या भागामध्ये  भाग-1 -  आनंद आणि शांती मिळवण्याची सात मार्ग  1   स्वतःला ओळखा आणि त्याचा अभिमान बाळगा 2  थकवा आणि चिंता टाळणाऱ्या चार चांगल्या सवयी  3  तुम्हाला थकवा का येतो आणि त्याव  रील उपाय . 4  थकवा काळजी आणि रागाची निर्मिती करणाऱ्या कंटाळला कसे पळून लावाल.  5  तुमची बलस्थाने तुम्ही लाख रुपयांना कधी विकाल का?  6   कसे दुर्लक्ष करावे हे करा टीका तुम्हाला दुखावणा...

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

Image
  आयुष्यात तुम्हाला खूप खूप पुस्तकं वाचायची असतात , इतर कुणी मित्र , किंवा फेसबुकवरचा  मित्र आणि त्याचे पुस्तक वाचून झाल्यावर त्याने पुस्तकाबद्दल फोटो पोस्ट केला किंवा कुणी तरी तुम्हाला अमुक तमुक पुस्तक वाच म्हणून सांगितले तर तुम्हाला ते पुस्तक वाचू वाटते .  पण खरी अडचण यापुढे येते . तुम्ही अनेक कारणं सांगत राहता आणि तेच काय पण कोणतंच पुस्तकं वाचत नाही . असे काही दिवस किंवा वर्ष निघून जातात तुम्ही एक पण पुस्तक वाचत नाहीत .  या काळात ज्याला आवड असते , त्याला सवड असते . असं म्हणत तुमचा एखादा मित्र या काळात प्रचंड पुस्तकं वाचून काढतो .  ही गोष्ट तुम्ही ही करू शकला असता , पण तुम्ही फक्त बहाणे शोधत राहता .  तुम्हाला कुणी विचारले  तुमचे तर पहिलं उत्तर असते , मला वेळच मिळत नाही .  जगातील एक श्रीमंत माणूस बिल गेट्स जेव्हा वर्षाला ५०-५५ पुस्तकं वाचून काढतो तेव्हा त्याला मिळालेले २४ तास हे आपल्याला पण मिळालेले असतात . किंबहुना या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक माणूस हा २४ तास किंवा २४ तासाचा एक दिवस घेऊन येत असतो .  तो त्यापुढे कधी ही कमी किंवा जास्त होत न...

पुस्तकं का वाचतो , या प्रश्नाचे नाही उत्तर .

Image
काही वर्षांपूर्वी ची गोष्ट असेल मला नेहमी एक प्रश्न विचारला जायचा , आणि तो प्रश्न असा होता की  तुला हे पुस्तकं वाचून काय मिळते ?  खरंतर हा प्रश्न मला कधीच पडला नाही , आणि का पडावा हाही प्रश्नच होताच .  पुस्तकांची आणि माझी गाठ सोळा  वर्षांपूर्वी पडली ,माझे एक मित्र होते वयाने मोठे होते . पण माझं आणि त्यांचं जमायचं .  मी त्या वेळी कॉलेज मध्ये शिकत होतो . माझ्याकडे वेळ ही होता .आणि या वेळेत काय करायचे म्हणून मी या मित्राकडून पुस्तक आणले . आणि ते वाचायचे म्हणून वाचले .  छोटेखानी पुस्तक होते हे पण मी लगेच वाचून काढले . आणि त्यानंतर मी पुस्तकं वाचतच गेलो .  पुस्तकं वाचून मला काय मिळाले याचे उत्तर माझ्याकडे  अजून तरी नाही .  पण तुम्ही  पुस्तकं वाचावीत तुम्हाला त्याचे उत्तर  मिळते का बघा . 

.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे

Image
.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे   धोनी नेमका घडला कसा ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी शोधायचा प्रयत्न केला आहे  . हे पुस्तक त्याचाच शोध घेते .  शेवटच्या दोन बॉल वर १२ धावा लागत असतील आणि त्या वेळेस त्याच्या मनाची अवस्था काय असेल ? तो काय विचार करत असेल . त्याच्या मनात किती काहूर माजले असेल .  हे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात . मोक्याच्या व कठीण समयी तो एवढा कसा कुल राहू शकतो . आपण त्याच्या सारखे का वागू शकत नाही . किंवा इतर खेळाडू धोनी सारखे का वागू शकत नाहीत . खरंतर या प्रश्नाचे उत्तर धोनीच देऊ शकतो . लेखिकेने ते शोधण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केला आहे . आणि बऱ्याच अंशी धोनी कडून ह्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली आहेत .  पुस्तक एकूण पाच भागात आहे .  ■ योग्य मनोभूमिका  ■ गोल  ■फॉलो द प्रोसेस  ■ अ पिसफुल वॉक होम  ■ टू बी द चोझन लीडर . ● यशोमार्गात जवळपास ७०% श्रेय मानसिक कोशल्याचं असतं .उरलेलं ३०% श्रेय उपजत आणि प्राप्त केलेल्या प्रतिभेचं असतं .  ●  आयुष्य जर सरळ आणि साधं असेल तर त्यात गुंतागुंत  कशाला  करायची...

पु .ल .देशपांडे यांची पुस्तकं .

Image
उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे महाराष्ट्राचे भाई म्हणजेच पु . ल . देशपांडे .  यांच्या काही पुस्तकांची यादी खाली देत आहे .  आपण वेळ काढून ही पुस्तकं जरूर वाचावीत . अतिशय छान अशी ही पुस्तकं आहेत .  असा मी असा मी  खोगीर भरती  बटाट्याची चाळ  म्हैस  अंमलदार  अघळ पघळ  अपूर्वाई  दाद  उरलं सुरलं  एक झुंज वाऱ्याशी एका कोळियाने  काय वाट्टेल ते होईल  गणगोत गुण गाईन आवडी  गोळाबेरीज  जावे त्यांच्या देशा  ती फुलराणी नस्ती उठाठेव हसवणूक  पुरचुंडी   पूर्वरंग मराठी वाङमयाचा  इतिहास रविंद्रनाथ : तीन व्याख्याने रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १  रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २  सुंदर मी होणार . वाऱ्यावरची वरात व्यक्ती आणि वल्ली सखाराम गटाने  आपुलकी .  इ. ... टीप - पुस्तकांची यादी इंटरनेट वरून घेतली आहे .

वाचाल तर वाचाल.

Image
हॅलो , कसे आहात ? पुस्तकं वाचता आहात ना ! अहो वाचलेच पाहिजे . हा तुम्हाला एखाद्या मालिकेतील साधर्म्य साधणारा सवांद वाटेल .  पण खरं सांगू का ? आम्ही – तुम्ही सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत . किती वाचली पाहिजेत . तुम्हाला जसा वेळ काढता येईल , तेवढी वाचली पाहिजेत . समजा तुम्ही एका महिन्याला एक पुस्तक वाचत असाल तर वर्षाला बारा पुस्तकं वाचून होतील . आणि समजा तुम्ही अगदीच वेळ काढला आणि महिन्याला पाच पुस्तकं वाचली तर वर्षाला साठ पुस्तकं तुम्ही वाचू शकता . म्हणजे तुम्ही थेट बिल गेट्स च्या पंक्तीत जाऊन बसाल .  हो , बिल गेट्स च्या पंक्तीत . बिल गेट्स वर्षाला साधारण पन्नास ते साठ पुस्तकं वाचतात .  आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल बिल गेट्स यांना  पुस्तकं वाचायला वेळ कसा मिळेल ?  , या माणसाला पुस्तकं वाचनासाठी वेळ मिळणे एकदम दुरापास्त आहे . तुम्ही काही तरी चुकीचे सांगत आहात . नाही हे खरे आहे . तुम्हाला तसे वाटेल . वाटले तर तुम्ही गुगल ला शोधा ? गुगल तर चुकीची माहिती देणार नाही . गेल्या काही वर्षातील वृत्तपत्रातील बातम्या जर तुम्हाला सापडल्या तर त्या शोधा . म्हणजे तुम्हाला पट...

डोंगरी ते दुबई

Image
डोंगरी ते दुबई  मुंबई च्या 60 वर्षातील गुन्हेगारी क्षेत्राचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे ,. 50 च्या दशकात मुंबई कशी होती .  मुंबई चा पहिला डॉन कोण ?  तर दाऊद दुबई ला कसा गेला तिथून तो कराची ला कसा पोहचला .  अरुण गवळी , मन्या सुर्वे अशा अनेक डॉन ची कथा या पुस्तकात आहे . पहिल्या ओळी पासून हे पुस्तक तुमचा ताबा घेतं , पुढे काय - पुढे काय याची उत्सुकता लागत राहते . 93 च्या बॉम्ब स्फोटा नंतर दाऊद मुंबई त परत येऊ इच्छीत होता , त्याला कुणी आडवले . छोटा राजन वर हल्ला कसा झाला . छोटा शकील कोण होता . मुंबईत गॅंग वार कसं झालं , ते कुणी घडवून आणलं . दाऊद चा त्यात काय रोल होता . अबू सालेम कसा घडला . कसा डॉन झाला , त्याला पकडून कसे आणले . मन्या सुर्वे सर्वात हुशार आणि वाचक होता . अनेक कादंबऱ्याच वाचन त्याने केलं होतं .  70 च्या दशकात बॉलीवूड मधील सिनेमात गुन्हा घडल्यावर पोलीस उशिरा पोहचू लागली असं चित्रण दाखवू लागले  ते  का याच खरं कारण या पुस्तकात आहे . बॉलीवूड ला दाऊद ने आपल्या इशाऱ्यावर कसं नाचवले . त्यांच्या पार्टीला कोण कोण हजर होते . दाऊद चा प्रेमभंग झाल...

एकदा गेलेली पुस्तकं परत येत नाहीत ...

Image
.....एकदा गेलेली पुस्तकं परत येत नाहीत …  पुस्तकं वाचायची ज्यांना सवय असते , आणि जे ‘ बुक लव्हर म्हणून ओळखले जातात . त्यांना एक अनुभव नेहमीच येतो किंवा किमान एकदा तरी तो अनुभव त्यांना आलेला असतो , तो कोणता अनुभव हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ?  तो प्रश्न म्हणजे तुम्ही दिलेली पुस्तकं परत येत नाहीत किंवा ती फार मागावी लागतात किंवा कधी कधी तुम्ही विसरून जाता , आणि ते का विसरता तर तुम्ही ज्यांने कुणी तुमच्याकडून पुस्तकं नेली असतील त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी ती पुस्तकं नेलेली असतात आणि पुन्हा ती येतच नाहीत . आणि मग दिलेल्या पुस्तकाचा तुम्हाला विसर पडतो .  आजच्या लेखाचा हाच विषय आहे , तुम्ही दिलेले पुस्तक तुम्हाला मागे परत मिळाले का ? किंवा तुम्हाला ते पुस्तक मागे घेण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले .  बरोबर दोन वर्षांपूर्वी एका खूप जवळच्या मित्राला मी काही पुस्तकं दिली .  खरंतर त्याने ती माझ्याकडून घेतली . त्याला पुस्तकं वाचायची अचानक खुम-खुमी आली होती .  आणि मग त्याने पुस्तकं वाचायची त्याने नियोजन करायचे ठरवले , नियोजन झाले , पुस्तक वाचायचे ठरले . पण त्याची आता अश...

लॉकडाउन च्या काळात ऑनलाईन वृत्तपत्र वाचावी लागली आणि ऑनलाईन पुस्तकं ही .

Image
  लॉकडाउन मुळे आयुष्य बदलून गेले आहे . अनेकांना ‘ वर्क फ्रॉम होम ’  करावे लागले , असे काम यापूर्वी कुणीही केले नव्हते .  लॉकडाउन मध्ये पुस्तकांच्या दुकाना बंद होत्या ,आणि त्यामुळे पुस्तकं मिळणे कठीण होऊन बसले आहे . गेल्या दोन महिन्यात पुस्तकं कुणाला ही मिळाली नाहीत .  आणि मग त्याला पर्याय म्हणून काही जण ऑनलाईन पुस्तकाकांडे वळली .  कागदी पुस्तकं आणि ऑनलाईन पुस्तकं यात कोणती चांगली , यासाठी दोन गट पडतील . कागदी पुस्तकं वाचणारा गट नेहमी म्हणतो की आम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात , नवीन पुस्तक हाथी पडल्यावर त्याचा येणारा वास आम्हाला हवाहवासा वाटतो . पुस्तक वाचत असताना कुठपर्यंत वाचून झाले तिथे पान दुमडने हे ही त्यांना आवडते .  अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं समर्थन कागदी पुस्तकं वाचणारी मंडळी करत असतात . पण गेल्या दोन महिन्यात वृत्तपत्र सुद्धा उपलब्ध झालेले नाही ,आणि असे अनेक जण आहेत की ज्यांना दररोज वृत्तपत्र वाचायला लागायचे  .  किंबहुना रोज दोन किंवा तीन वृत्तपत्र वाचणारे देखील आहेत , पण या लॉकडाउन च्या काळात मात्र या सर्वांनी ऑनलाईन वृत्तपत्र वाचून काढली...

पुस्तकाचे नाव - व्हेन .

Image
... पुस्तकाचे नाव - व्हेन ,  लेखक - डॅनियल पिंक  हे पुस्तक प्रामुख्याने तुमच्याकडे एनर्जी कधी आणि कोणत्या वेळेत असते याचे भाष्य करते . लेखकाने ट्विटर च्या ट्विट मधून एक सर्व्हे केला असून त्यात त्याला असे दिसून आले की सकाळी जे लोक ट्विट करतात , ते सकारात्मक असतात . तर दुपारी जे ट्विट होतात , त्यात नकारात्मकता जास्त आढळून येते . व जेव्हा रात्र होते तेव्हा पुन्हा सकारात्मक ट्विट दिसून येतात . या पुढे जाऊन लेखकाने काही सर्व्हे केले असून त्यात त्याने असे मत नोंदवले आहे की सकाळी माणसे जास्त काम करतात ,  आणि त्यांच्या कडे पॉझिटिव्ह एनर्जी ही सकाळी दिसते ,  दुपारच्या वेळेत लोकांमध्ये चिडचिड अधिक प्रमाणात दिसून येते . .तर पुन्हा रात्री लोक नॉर्मल होतात , आणि जास्त पॉझिटीव्ह काम करतात . ६० ते ८० टक्के लोकांना सकाळी काम करू वाटते , तर उरलेल्या लोकांना रात्री काम करू वाटते . एडिसन ला रात्री काम करायला आवडायचे . ज्यांना रात्री काम करायला आवडेल त्यांनी जरूर करावे पण  रात्री काम करणारे दुसऱ्या दिवशी मात्र चिडचिड करतात . हे आढळून आलेले आहे . सलग काम केले तर कंटाळा येतो म्हणून न...

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?

Image
. .....पुस्तक वाचन ही प्रक्रिया खूप कंटाळवाणी असते का ? किंवा माणसापासून दूर घेऊन जाणारी असते का ?  हा प्रश्न अनेकदा पुस्तकं वाचन करणाऱ्या पुस्तकं प्रेमींना पडत असतो . आणि तो यासाठी की पुस्तकं वाचत करत असताना वाचणारा इतका गढून जातो की त्याला इतर काही कामं असतात याचा पण विसर पडत जातो . किंबहुना त्याला ती कामं च करू वाटत नाहीत .  तुम्ही हॅरी पॉटर वाचत असाल आणि तेवढ्यात तुम्हाला घरातील व्यक्तीनें काही वस्तू बाहेरून आणायला सांगितली तर तुमची यावर काय ‘ प्रतिक्रिया ’ असेल ?  किंवा तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांचे सतत फोन येत  असतील , आणि ते फोन कुणाच्या तरी वाढदिवसाच्या ‘ पार्टीला ’ जाण्यासाठी असतील तर  .  पुस्तकंप्रेमी हे जाण्याचं रद्द करून आपल्या पुस्तकात गढून जाणे पसंद करेल . तो पुस्तकात इतका गुंतलेला असतो की त्याला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो .  ,एखादी कादंबरी वाचत बसलेला असताना जर त्याला काही काम सांगितले असेल तर तो त्या कामाकडे दुर्लक्ष करेल किंवा ते काम उद्या वर तरी पुढे नेईल . अनेकदा वाचन प्रेमींना पुस्तकं वाचनाव्यक्तिरिक्त क...

पुस्तकांच्या दुकाना कधी सुरू होणार ?

Image
मार्च महिन्यापासून आपल्या देशात संपूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले , हा ब्लॉग लिहीत असेपर्यंत अजून तरी सगळ्या देशात लॉकडाउन आहे .  आणि पुढच्या काळात देखील लॉकडाउन काही काळासाठी वाढेल असा अंदाज आहे .  काही राज्य सरकारने तो लागू करावा म्हणून केंद्रसरकार कडे तशी मागणी ही केली आहे .  हा ब्लॉग लिहीत असेपर्यंत ५० दिवसांचा लॉकडाउन पूर्ण झाला आहे . आणि या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना सोडून सर्व काही बंद होते .  आणि त्यात पुस्तकांची दुकानं ही आली . केंद्रसरकारने पुस्तकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते .  त्यामुळे या काळात पुस्तकांची दुकानं पूर्णपणे बंद राहिली .  आणि त्याचा फटका पुस्तकवाचन करणाऱ्या वाचन प्रेमींना बसला .  गेल्या आठवड्यात दारूच्या दुकाना सुरू करण्याचा आदेश आला , आणि त्या सुरू ही झाल्या .  आपण दारू विकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या ही पाहिल्या . दारूच्या दुकानावर चर्चा ही खूप झाली .  दारू पासून किती महसूल मिळतो याची प्रचंड चर्चा झाली . दारूवरचे विनोद ही सोशल मीडियावर खूप गाजले . पण त्याच बरोबर वाचन प्रेमींनी मग पुस्...

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

Image
          "  पुस्तकांच्या किंमती या वाढतच आहेत ,  माझ्या इतक्या कमी पगारात मी  पुस्तकं विकत घेऊ कशी ? ” अंकित .  अंकित ला पुस्तकं वाचण्याची लहान असल्यापासून  आवड होती , आणि अजून ही ती आहेच .   गेल्या वर्षी त्याला नोकरी लागली . ती नोकरी त्याला फार पगार देत नाही . आणि त्यात त्याच्या नोकरीचे ठिकाण हे ग्रामीण भागात आहे .  अशातच एखादी छोटी ‘ लायब्ररी ’ ही त्याच्या गावात नाही . अशी एखादी ‘ लायब्ररी ’  गावात उपलब्ध असती तर त्याला ती ‘  जॉईन ’ करता आली असती . म्हणजे त्याला अनेक पुस्तकं वाचता आली असती . पण गावात तर लायब्ररी नाहीच पण आसपास च्या गावात ही लायब्ररी नाही .  त्याच्या बोलण्यातून आणखी एक गोष्ट जाणवली गावात सर्व काही उपलब्ध आहे पण पुस्तकांचं दुकान नाही आणि ‘ लायब्ररी ’ नाही .  हल्ली ‘ ऑनलाईन ’  चा जमाना आहे , अनेक पुस्तकं ही ‘ ऑनलाईन ‘  ही तो वाचू शकतो . पण त्याला ‘ ऑनलाईन ’  पुस्तकं वाचू वाटत नाहीत ,  ‘ जुनं ते सोनं ’ असे त्याचे म्हणणे आले यावर . ‘ ऑनलाईन ’  मुळे डोळ्यांना त्रास होतो...

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

Image
पुस्तक वाचनाची बैठक / सवय ही  प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते , आणि तशी ती असतेही .  काहींना  सकाळी – सकाळी उठून पुस्तक वाचू वाटते तर काहींना रात्री झोपायच्या अगोदर पुस्तक वाचायला लागते .   म्हणजे ते लागतेच .  काहींना प्रवास करताना पुस्तक वाचायला आवडते . तर काही जण  असे ही असतात जे टॉयलेट मध्ये कमोड वर बसून पुस्तक वाचून काढतात . अर्थात ही प्रोसेस भयानक आहे .  या पद्धतीने तुम्ही  वाचत असाल तर तुमच्या पचन संस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो . पोट साफ न  होण्याची समस्याच तुम्हाला होऊ शकते .  अनेक मोटीवेशनल वक्ते असे म्हणतात की जी मोठी लोक आहेत म्हणजे मोठ्या कंपनीचे  मालक आहेत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्यांना सकाळी पुस्तकं वाचायची सवय असते .  सकाळी व्यायाम झाला की थोड्या वेळ ते पुस्तक वाचतात व त्यानंतर कामावर हजर होतात .  ही सवय चांगली मानली जाते , तुम्ही सकाळी पुस्तक वाचत असाल तर तुम्ही दिवसभर ‘ फ्रेश ’ राहता .  जसे शरीरासाठी सकाळी व्यायाम आवश्यक असतो , आणि तो रोज केला तर तुम्हाला किती फ्रेश वाटते याचा अनुभव तुम...

लॉकडाउन च्या काळात पुस्तकप्रेमी पुस्तक वाचनाकडे मोठ्या वळली ?

Image
...साधारण या वर्षांतील मार्च महिन्याच्या तिसऱ्या आणि  चौथ्या आठवड्यात लॉकडाउन जाहीर झाले , आणि कालांतराने ते तीन टप्प्यात वाढले .   हा काळ तसा तापदायक आणि घरात बसून राहायचा होता . सगळीकडे एक चर्चा सुरू होती आणि ती म्हणजे सगळे घरात बसा .  सुरुवातीला वाटले लॉकडाउन हे लवकर उठेल  पण नंतर ते वाढत गेले . आणि मग या काळात काय करायचे . म्हणून अनेक जण आपल्या जुन्या छंदा कडे वळले . तर काहींनी आपला छंद या काळात आणखी चांगल्या रीतीने जोपासला .  या अनेक छंदापैकी पुस्तक वाचन हा एक अनेक जणांचा छंद होता .  मग अनेक जणांनी आपल्या घरात असणारी पुस्तकं बाहेर काढली . त्यांना ऊन दिलं . आणि पुन्हा पुस्तकं वाचायला सुरुवात केली   काहींसाठी पुस्तकं वाचन करने हा प्रकार  नवीन होता .मग त्यांनीही पुस्तक हातात घेतले .  हे सगळं होत असताना अनेक जण पुस्तकाबद्दल चर्चा करू लागले , काहींनी फेसबुक किंवा इतर काही अँप्स वर पुस्तकातील कोणत्या गोष्टी आवडल्या त्याबद्दल ही पोस्ट करायला सुरुवात केले .  आणि बघता – बघता पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वाढत गेली . ती इतकी वाढली की प...

ट्विटर - यांनी जग बदललं - लेखक - अतुल कहाते .

Image
ट्विटर  – यांनी जग बदललं - लेखक – अतुल कहाते - मनोविकास प्रकाशन . संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या १४० शब्दांची रचना  असलेल्या ट्विटर ची ही गोष्ट आहे . आता साधारण सगळ्यांना ट्विटर बद्दल माहिती झाले असेल आणि त्याची काय किमया आहे याची ही सर्वांना जाणीव असेल . ट्विटर हे एक सोशल अँप आहे , त्याच्या सोबतीला फेसबुक किंवा व्हाट्सअप्प हे सुध्दा सोशल अँप आहेत . पण जी कमाल ट्विटर करू शकते ते इतर अँप नाही करू शकत . आपलं मत किंवा एखादा संदेश जर कुणापर्यंत पोहचायचे असेल तर अवघी १४० शब्द आपल्याला भेटतात . आणि तीच १४० शब्द कमाल करतात .  ट्विटर चा  वापर आजच्या घडीला काही कोट्यवधी लोक करत असतील , करत आहेत .  पण ट्विटर चा जन्म हा काही सरळ झालेला नाही . त्याची कहाणी ही खूप रंजक आहे . ती एखाद्या सिनेमा सारखी वाटते . कारण जे कुणी याचे संस्थापक होते त्यांची च हक्कालपट्टी या कंपनीतुन पुढे जाऊन करण्यात आली होती . ट्विटर ची मूळ संकल्पना ही नोआ ग्लास व जॅक डॉसी च्या डोक्यात साकारली . आणि मग नोआ ने इव्हान उर्फ इव्ह ला यात गुंतवणूक करण्यासाठी आग्रह केला . इव्ह ने अगोदर ब्लॉगर...

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

Image
सन - २०१९ मध्ये एका निरीक्षणानुसार भारतीय लोकांनी मोबाईल चा वापर हा सरासरी  दिवसाला चार  तास केला , सन - २०२० मध्ये मोबाईल चा वापर हा आणखी एक तास वाढणार आहे , म्हणजे तो दिवसाला पाच तास होणार आहे . स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या गेल्या काही  वर्षात आपल्या देशात प्रचंड  प्रमाणात वाढली आहे . त्यात मोबाईल मध्ये अनेक नवनवे अँप्लिकेशन ही वाढत आहेत . मोबाईल मध्ये जुनेच पण आपला जास्त वेळ खर्च करायला लावणारी अँप्लिकेशन म्हणजे फेसबुक , व्हाट्सअप्प ही दोन अँप्लिकेशन . पण अलीकडच्या काळात टिक टॉक या अँप्लिकेशन मुळे ही अनेकांचा वेळ खर्च होत आहे .  सोबतीला यु ट्यूब सारखे अँप्लिकेशन ही आहेच . आणि यांच्या वापरामुळे पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे .  त्यामुळे पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे . दिवसभर जर आपण तीनशे मिनिटे म्हणजे पाच तास फोन वर असू तर आपण यातला एक तास कमी करायला हवा .  आणि त्या एका तासात आपण वाचन केले तर आठवड्यात किमान सात तासांचे वाचन होऊन जाते . सरासरी साठ पाने आपण दिवसाला वाचले तर आठवड्याला दोनशे पानांचे दोन पुस्तकं ...

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

Image
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोविड-१९ ने धुमाकूळ घातला आहे . जगातील असा एक ही देश आता  राहिलेला  नाही की जिथे कोरोनो बाधित  रुग्ण भेटला नाही . आपल्या देशाचा विचार करता हा  व्हायरस आपल्या देशात  मार्च महिन्यात आला . सुरुवातीला तो केरळ मध्ये आला , आणि त्यानंतर तो संपूर्ण देशात हळू हळू पसरला . आणि मग  त्यानंतर आपल्या देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले , पुढे जाऊन ते वाढवण्यात आले . या लॉकडाऊन च्या काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला पण त्यातल्या एका महत्त्वाच्या क्षेत्राला फटका बसला ते क्षेत्र म्हणजे पुस्तक प्रकाशन क्षेत्र . या काळात ऑनलाईन शॉप ही  बंद आहेत ,ज्या  घरपोहोच सेवा द्यायच्या .  त्याच बरोबर पुस्तकांच्या दुकानाही बंद आहेत . आणि त्यामुळे अनेक पुस्तक प्रेमींना पुस्तक विकत घेता आलेले  नाही . गेल्या काही वर्षांत ऑनलाईन पुस्तकं विकत घेणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे . अनेकांना बाजारपेठेत जाऊन पुस्तक विकत घेणे शक्य होत नाही ,तर काही जणांची ही अडचण असते की त्यांच्या आसपास पुस्तकाचं दुकानचं नसतं . म...

द किस ऑफ लाईफ - कॅन्सर शी लढा दिलेल्या मुलाची कथा .

Image
कॅन्सर शी लढा देणाऱ्या सुपरहिरो मुलाची कथा द किस ऑफ लाईफ – लेखक इम्रान हाश्मी इम्रान हाश्मी ला तुम्ही सर्व जण ओळखत असाल , 2004 मध्ये आलेल्या सुपर हिट मर्डर या सिनेमाचा तो हिरो होता . ‘ भिगे ओठ तेरे ” त्याच्या वर चित्रित झालेले हे  गाणे त्या काळी प्रचंड गाजले होते . हाच तो हिरो , ज्याने उन्मादक सिन दिले होते , ते देताना आपल्याला किती अवघडलेले पणा आला होता . आणि मला सिरीयल किसर हे विशेषण कसे पडले हे या पुस्तकात वाचायला मिळतेच पण ही कहाणी त्याची नसून त्याच्या लहान अश्या आणि चार वर्षे वय असणाऱ्या अयान ची  आहे . अयान या पुस्तकाचा हिरो , इंडोनेशिया च्या  सुट्टीवरून आल्यानंतर या रोगाचे निदान होते . एक दिवस हॉटेल मध्ये असताना , अयान च्या लघवी द्वारे प्रचंड रक्त जाते . आणि ते पाहून इम्रान व त्याच्या पत्नीच्या मनात धडकी भरते , मुलाला कॅन्सर तर नसेल . दोघे ही त्याला हिंदुजा मध्ये ऍडमिट करतात , एव्हाना रिपोर्ट आलेले असतात . अत्यंत कमी प्रमाणात आढळणारा विल्म्स ट्युमर नावाचा कॅन्सर त्याला झालेला असतो . माझ्या अयानलाच का ? त्याने कुणाचे कधी काही  वाईट केले का...

कोरोनो व्हायरस च्या काळात काय करता येईल.

Image
साधारण 2 महिन्यांपूर्वी आम्ही काही मित्र कोरोनो बद्दल बोलत होतो . तेव्हा सर्वांचे एकमत असे झाले होते की कोरोनो आपल्या देशात हाथ-पाय पसरणार नाही . आपल्या कडे आला तरी तो फार मर्यादित म्हणजे चार-पाचशे च्या घरात राहील . पण आजची आकडेवारी ही वेगळंच सांगत आहे . चिंताजनक अशी परिस्थिती होऊन बसली आहे . चीन पुरता हा व्हायरस राहील . असे ही आम्हाला त्यावेळी  वाटले होते . पण आता संख्या झपाट्याने वाढत आहे .प्रत्येक  चोवीस तासात आकडे वाढत चालले आहेत . रात्री अपडेट घेतले तर दुसऱ्या दिवशी सकाळी हा आकडा खूप वाढलेला दिसून येतो . लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांनी थोडी काळजी घ्यायला हवी होती , पण लोक कसलीही तमा न बाळगता फिरत राहिली . घर सोडून कुठे ही जाऊ नका सांगितले असताना ही अनेकांनी आपआपली घरे काहीही कारण नसताना सोडली .जी गोष्ट टाळायला हवी होती तीच मोठया प्रमाणावर लोक करून बसले . त्यातून नको त्या गोष्टींसाठी गर्दी होत राहिली . पुढच्या काळात आता हा आकडा किती पर्यंत जातोय हे आता सांगणे कठीण आहे . पण अजून ही वेळ गेलेली नाही . लोकांनी घरात बसने गरजचे आहे . मान्य आहे की तुम्हा - आम्हाला ...