द किस ऑफ लाईफ - कॅन्सर शी लढा दिलेल्या मुलाची कथा .
कॅन्सर शी लढा देणाऱ्या सुपरहिरो मुलाची कथा
द किस ऑफ लाईफ – लेखक इम्रान हाश्मी
इम्रान हाश्मी ला तुम्ही सर्व जण ओळखत असाल , 2004 मध्ये आलेल्या सुपर हिट मर्डर या सिनेमाचा तो हिरो होता .
‘ भिगे ओठ तेरे ” त्याच्या वर चित्रित झालेले हे गाणे त्या काळी प्रचंड गाजले होते .
हाच तो हिरो , ज्याने उन्मादक सिन दिले होते , ते देताना आपल्याला किती अवघडलेले पणा आला होता . आणि मला सिरीयल किसर हे विशेषण कसे पडले हे या पुस्तकात वाचायला मिळतेच पण ही कहाणी त्याची नसून त्याच्या लहान अश्या आणि चार वर्षे वय असणाऱ्या अयान ची आहे .
अयान या पुस्तकाचा हिरो , इंडोनेशिया च्या सुट्टीवरून आल्यानंतर या रोगाचे निदान होते . एक दिवस हॉटेल मध्ये असताना , अयान च्या लघवी द्वारे प्रचंड रक्त जाते . आणि ते पाहून इम्रान व त्याच्या पत्नीच्या मनात धडकी भरते , मुलाला कॅन्सर तर नसेल .
दोघे ही त्याला हिंदुजा मध्ये ऍडमिट करतात , एव्हाना रिपोर्ट आलेले असतात .
अत्यंत कमी प्रमाणात आढळणारा विल्म्स ट्युमर नावाचा कॅन्सर त्याला झालेला असतो .
माझ्या अयानलाच का ? त्याने कुणाचे कधी काही वाईट केले का ? पण नियतीने अयान च्या वाट्याला कॅन्सर चे भोग लिहले होते .
त्याला कॅन्सर चे निदान झाले होते .
या नंतर इम्रान लिहतो की माझी कुणाशीही बोलण्याची इच्छा नव्हती . माझे हृदयाचे ठोके वाढले होते . मला प्रचंड भीती वाटत होती .
माझ्या पाया खालची जमीन सरकली होती . मला प्रचंड नैराश्य आलं होतं . मला एकच प्रश्न सतावत होता . अयान च का ? अयान लाच का कॅन्सर ?
‘ बॅटमॅन ‘ हे अयान च आवडतं पात्र . म्हणून इम्रान त्याला बॅटमॅन बनून व तसाच आवाज काढून फोन करतो .
आणि त्याच्याशी बोलू लागतो , मी बॅटमॅन बोलतोय , तुला बॅटमॅन व्हायचे आहे का ?
समोरून आवाज येतो , हो . मला बॅटमॅन व्हायचे आहे .
मग त्यासाठी तुला काही तरी करावे लागेल त्यासाठी तू तयार आहेस का ? ( परीक्षा )
परत समोरून आवाज येतो , हो. मी तयार आहे .
मग तू झालाच आता आर्यन मॅन ( अयान मॅन )
आणि फोन कट होतो .
अयान ची पहिली अतिशय वेदनादायक केमोथेरपी होणार असते . तीच त्याची परीक्षा असते .
पण हे सगळं विसरून अयान बॅटमॅन सारखे होण्यासाठी होकार देतो .
पहिला सिनेमा येण्याअगोदर एका ओळीच्या संवादा साठी इम्रान ला 45 रिटेक द्यावे लागले होते .
इम्रान ला सिनेमा च डायरेक्टर व्हायचे होते पण त्याची आवड बदलली आणि तो ऍक्टर झाला .पुढे मर्डर हिट झाल्यावर त्याच्या कडे सिनेमाची रांग लागली .
कॅन्सर मधला सी हा खूप मोठा असतो , तो सी तुमचं आयुष्य उध्वस्त करून टाकू शकतो .कॅन्सर नावाची कृष्ण छाया एकदा का दाटून आली की विरतच नाही . पुढील संपूर्ण आयुष्यभर ती तुम्हाला व्यापून राहते , निःशब्दपणे दबा धरून बसते .
‘ आपण जिंवत असेपर्यंत आपल्या बाळाचं रक्षण करणं ’ पिता म्हणून असणाऱ्या प्राथमिक कर्तव्यात आपण अपयशी ठरलो हे त्यांना कसं सांगणार ?
भारतातील शस्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या उपचारासाठी अयान ला कॅनडा ला नेण्यात आले तिथे त्याची आता पुढची केमो होणार होती , त्याच्या अगोदर इम्रान त्याला पुन्हा बॅटमॅन म्हणून फोन करतो , तुला अयान मॅन व्हायचे आहे ना ? अयान लगेच तयार होतो , पुढची परीक्षा आता भयंकर असते .
पण मला बॅटमॅन होता येईल म्हणून अयान लगेच तयार होतो .
कॅनडात उपचार घेत असताना त्याला एक दिवस इतका त्रास होतो की छोटासा अयान 3 बादल्या भरून उलट्या करतो .
याच्यावरून तुमच्या लक्षात येईल त्याला किती त्रास होईल .
सिनेमे आता मागे पडले होते , काम तर करावे लागणार होते तीन सिनेमाचे शूटिंग थांबले होते , ते पूर्ण करण्यासाठी इम्रान कॅनडातून निघून येतो .
एकीकडे सिनेमाचे काम सुरू असते दुसरीकडे उपचार , काम संपल्यावर इम्रान पुन्हा कॅनडा त जातो .
अयान चे उपचार आता संपलेले असतात , अयान मोठ्या दिव्यातून बाहेर आलेला असतो .
लहान मुलांना गोड खाण्याची सवय असते , आणि ते देण्यासाठी आपण ही अग्रेसर असतो , बाहेरील जंक फूड किंवा गोड पदार्थांमुळे लहान मुलांमध्ये या प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता असते .
म्हणून बाहेरील सगळे पदार्थ टाळावेत . तसेच खाण्यामध्ये हिरव्या भाज्या , बोकरली , गाजर , मुळा या सारख्या पदार्थाचा वापर करावा .
मुलांच्या प्रत्येक जेवणामध्ये थोडीशी हळद घालावी , हळद कॅन्सर विरोधी काम चांगल्या प्रकारे करते .
कॅन्सर च्या निमित्ताने इम्रान ने बरेच वाचन केले , त्यासंबंधी माहिती यात आहे , ती वाचलीच पाहिजे अशी आहे .
व आपल्या मुलांना कॅन्सर पासून नेहमीच दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा .
हॉटेल मधील पदार्थ , जंक फूड , अति प्रमाणात साखरेचे प्रमाण असलेले चॉकलेट , साखरेचे पदार्थ लगेचच टाळावेत .
कॅन्सर हा होता कामा नये या साठी प्रयत्न करावेत , कॅन्सर मधील केमोथेरपी ही फार भयंकर असते .
तीचं स्वरूपही आपण बघू शकत नाही , इतकी ती भयंकर असते .
या काळात अयान हा मोठया माणसासारखा समजूतदार पणे वागला , इतका मोठ्या आजाराला तो सामोरा गेला , टेनिस बॉल एवढी गाठ त्याच्या पोटातुन बाहेर काढण्यात आली .
या मोठ्या दुःखाला तो सामोरा गेला . हसत हसत त्याने कॅन्सर चा सामना केला . आणि त्यातून तो बाहेर आला .
आता तो अयान मॅन झाला होता .
एकदम स्ट्रॉंगेस्ट मुलगा .
हो एकदम स्ट्रॉंगेस्ट मुलगा .
काही महिन्यानंतर तो शाळेत जाऊ लागला , या दरम्यान शाळेत धावण्याची स्पर्धा असते त्या स्पर्धेत अयान भाग घेतो .
पण , धावताना तो पडतो , या प्रसंगी सगळ्याच्या काळजाचा ठोका चुकतो , तो पुन्हा उठतो व धावू लागतो , थोड्यावेळाने तो पुन्हा पडतो , पुन्हा उठतो आणि एन्ड पॉईंट गाठतो , खरंतर तो या स्पर्धेत शेवट आलेला असतो .
पण सर्व जण उभा राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवत असतात .
हे दृश्य पाहून इम्रान तिथून उठतो आणि थेट घर गाठतो .
एवढी शक्ती मुलांमध्ये येते कुठून ? अयानने आपल्या इच्छेच्या आड आलेले सगळे अडथळे पार केले होते , आपल्या साध्या , सोप्या कृतीतून त्याने मलाच एक नवा धडा शिकवला होता . आता त्याच्यापुढे मी फारच खुजा आहे , असं वाटायला लागले होते .
इतक्या जीवघेण्या अनुभवानंतर , दोन वेळेस पडून पुन्हा उभा राहणं सोपं नाही .आणि ती स्पर्धा पूर्ण करून डोळे मिचकावत हसणंही सोप नाही , मी यातून एक धडा शिकलो ,आयुष्यात सगळ्याच गोष्टी अस्थिर असतात , तुमचे पाय कितीही डगमगू द्या , तुम्हाला कितीही जखमा होवोत ,तुम्ही पडा , सरपटा ,उड्या मारा काहीही करा , पण परत उठून उभा राहा . पहिलं पाऊल टाका .
अयान कडून हाच धडा मला मिळाला होता .
अयान घरी आल्यावर इम्रानच्या जवळ येतो , आणि म्हणतो मी हरलो म्हणून काय झाले , पण स्पर्धा तर पूर्ण केली ना ? पप्पा .
इम्रान त्याला आपल्या मिठीत घेऊन आपल्या अश्रूनां मोकळी वाट करून देतो .
छोट्या अयान ची ही कहाणी , जरूर वाचावी अशी .
ज्याने कॅन्सर ला ही पराभूत केले त्याची कहाणी .
हे पुस्तक जरूर वाचा , एकदा नाही दोनदा वाचा .

Yes... I will read ...
ReplyDeleteMust read
ReplyDelete