वाचाल तर वाचाल.

हॅलो , कसे आहात ? पुस्तकं वाचता आहात ना ! अहो वाचलेच पाहिजे .
हा तुम्हाला एखाद्या मालिकेतील साधर्म्य साधणारा सवांद वाटेल . 
पण खरं सांगू का ? आम्ही – तुम्ही सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत . किती वाचली पाहिजेत . तुम्हाला जसा वेळ काढता येईल , तेवढी वाचली पाहिजेत . समजा तुम्ही एका महिन्याला एक पुस्तक वाचत असाल तर वर्षाला बारा पुस्तकं वाचून होतील . आणि समजा तुम्ही अगदीच वेळ काढला आणि महिन्याला पाच पुस्तकं वाचली तर वर्षाला साठ पुस्तकं तुम्ही वाचू शकता . म्हणजे तुम्ही थेट बिल गेट्स च्या पंक्तीत जाऊन बसाल . 
हो , बिल गेट्स च्या पंक्तीत . बिल गेट्स वर्षाला साधारण पन्नास ते साठ पुस्तकं वाचतात . 
आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल बिल गेट्स यांना  पुस्तकं वाचायला वेळ कसा मिळेल ?  , या माणसाला पुस्तकं वाचनासाठी वेळ मिळणे एकदम दुरापास्त आहे . तुम्ही काही तरी चुकीचे सांगत आहात . नाही हे खरे आहे . तुम्हाला तसे वाटेल . वाटले तर तुम्ही गुगल ला शोधा ? गुगल तर चुकीची माहिती देणार नाही . गेल्या काही वर्षातील वृत्तपत्रातील बातम्या जर तुम्हाला सापडल्या तर त्या शोधा . म्हणजे तुम्हाला पटेल . 
आज आपल्या ब्लॉग चा हा विषय नाही , आपला विषय आहे आपण पुस्तकांसाठी वेळ का काढू शकत नाही . 
वर जो फोटो दिसत आहे ना , तो कुणीतरी मला माझ्या मोबाईल वर पाठवला . मी ही फार वेळाने तो पाहिला . फोटो ग्रुप वर आलेला होता . आणि ग्रुप वर असे बरेच काही येऊन आदळत असते . त्यात आणखी एका फोटो ची किंवा इमेजेस ची भर म्हणून मी तो सोडून दिला होता . आणि सहज बघावा म्हणून बघितला तर मला एकदम साक्षात्कार झाला . आपण बिल गेट्स इतका वेळ का काढू शकत नाही आणि त्याचे एकमेव कारण आपण सोशल मीडियावर किती तरी वेळ पडीक असतो . बस एका एवढ्या कारणामुळे आपल्याला पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही . 
आता तो फोटो तुम्ही नीट बघा काय दिसेल त्यात , एक पुस्तक आहे , ते एका मुलाच्या पोटावर जोर-जोरात हाथ देऊन त्याच्या पोटात किंवा शरीरात जे काही गेले आहे म्हणजे फेसबुक , त्यावरील कमेंट , त्यावरील लाईक , इन्स्टाग्राम  , त्यावरील लाईक , कमेंट , टिकटॉक असं बरंच काय – काय आहे त्यात . म्हणजे आता तुम्ही विचार करा . आपण किती वेळ या गोष्टी वर वाया घालवत असतो . जेवढा वेळ बिल गेट्स ला मिळालेला आहे तेवढाच वेळ तुम्हाला किंबहुना जगातील सगळ्या मानव जातीला मिळाला आहे . 
मग बिल गेट्स सारखी माणसे वेळ काढू शकत असतील तर आपण का नाही .
हा प्रश्न प्रत्येकाने स्वतः ला विचारला पाहिजे . हे फक्त पुस्तकांना लागू होते का ? नाही . ही गोष्ट सगळीकडे लागू होते . आपण आपल्या कामापुरता मोबाईल वापरला पाहिजे , आपल्या मोबाईल मध्ये टाईमपास होईल असे मोबाईल अँप्लिकेशन कधी ही नकोत . तर ज्याने आपली प्रगती होईल असे मोबाईल अँप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये हवेत .
पुस्तकं वाचनासाठी वेळ मिळत नाही हे पुस्तक वाचन न करण्याचे कारण कसे काय होऊ शकेल . आता तुम्ही ठरवायचे आहे पुस्तकं वाचायची की मोबाईल वर टाईमपास करणाऱ्या मोबाईल अँप्लिकेशन वर पडीक राहायचे आहे . 
शेवटी वाचाल तर वाचाल . 

Comments

Post a Comment

धन्यवाद

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?