पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .




         



"  पुस्तकांच्या किंमती या वाढतच आहेत ,  माझ्या इतक्या कमी पगारात मी  पुस्तकं विकत घेऊ कशी ? ” अंकित .
 अंकित ला पुस्तकं वाचण्याची लहान असल्यापासून  आवड होती , आणि अजून ही ती आहेच .
  गेल्या वर्षी त्याला नोकरी लागली . ती नोकरी त्याला फार पगार देत नाही . आणि त्यात त्याच्या नोकरीचे ठिकाण हे ग्रामीण भागात आहे . 
अशातच एखादी छोटी ‘ लायब्ररी ’ ही त्याच्या गावात नाही . अशी एखादी ‘ लायब्ररी ’  गावात उपलब्ध असती तर त्याला ती ‘  जॉईन ’ करता आली असती . म्हणजे त्याला अनेक पुस्तकं वाचता आली असती . पण गावात तर लायब्ररी नाहीच पण आसपास च्या गावात ही लायब्ररी नाही . 
त्याच्या बोलण्यातून आणखी एक गोष्ट जाणवली गावात सर्व काही उपलब्ध आहे पण पुस्तकांचं दुकान नाही आणि ‘ लायब्ररी ’ नाही . 
हल्ली ‘ ऑनलाईन ’  चा जमाना आहे , अनेक पुस्तकं ही ‘ ऑनलाईन ‘  ही तो वाचू शकतो .
पण त्याला ‘ ऑनलाईन ’  पुस्तकं वाचू वाटत नाहीत ,  ‘ जुनं ते सोनं ’ असे त्याचे म्हणणे आले यावर . ‘ ऑनलाईन ’  मुळे डोळ्यांना त्रास होतो . जास्त वेळ ‘ स्क्रीन ’  नाही पाहू शकत .  त्यामुळे त्याने सुरुवातीला काही काळ ‘ ऑनलाईन ’  पुस्तकांचा पर्याय ‘ टेस्ट ’ करून पाहिला . पण तो त्याला रुचला नाही .
मग आता काही करता येईल का ? हा त्याचा मुख्य प्रश्न .
पुस्तकांच्या किंमती हा विषय खरंतर कुणीतरी चर्चेला घ्यायला हवा . आणि त्याच बरोबर गावा-गावात ग्रंथालय कसे आणता येईल हे ही बघायला हवे . 
आपण मुंबई किंवा पुणे सारख्या शहरात गेलो तर ‘ लायब्ररी ’  ची संख्या ही निश्चितच जास्त आहे . अर्थात त्या ही ‘ लायब्ररी ’  मध्ये जाऊन पुस्तकं वाचायला  येणाऱ्यांचे प्रमाण ही कमी होत चालले आहे . 
काही ‘ लायब्ररी ‘  याला अपवाद आहेत . पण ग्रामीण भागात अजून ही ग्रंथालये उपलब्ध नाहीत ,तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या  ग्रामपंचायती मध्ये अजून ही ग्रंथालये  उपलब्ध नाहीत . ही खरी शोकांतिका आहे . आणि जिथं उपलब्ध आहे तिथे ही पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या नगण्य आहे . 
त्यामुळे खाजगी ग्रंथालय सुरू करायला कुणी ही धजावत नाही आणि ग्रामीण भागात चारशे किंवा पाचशे रुपयांचे पुस्तक घेणे ही परवडत नाही . पाचशे रुपयांचे पुस्तकं घेतले तर तेवढ्या पैशात आठवडी बाजार होतो . त्यामुळे एकदम तीन- किंवा चार पुस्तकं घेणे परवडतच नाही . 
अंकित सारखे अनेक तरुण आहेत , त्यांना महिनाकाठी दहा – बारा पुस्तकं वाचायची आहेत . विकत घ्यायची आहेत . पण पुस्तकांच्या किंमती त्यांना पुस्तकं घेऊ देत नाहीत .
अनेक पुस्तकांच्या किंमती या कमी असतात , पण ती पुस्तकं जर घ्यायचीच नसतील किंवा ती वाचायची नसतील तर कमी किंमतीची पुस्तकं घेऊन करायचे काय ? 
त्यामुळे अंकित चा प्रश्न एकदम महत्त्वाचा व बिनतोड वाटतो . अनेक जण अनेक पर्याय सांगतील . पण तरीही या प्रश्नाचे उत्तर सुटेल असे वाटत नाही .
आता पुस्तकांच्या किंमती कमी असाव्यात  का? हा खूप जटील प्रश्न आहे . 
गावोगावी ग्रंथालय उपलब्ध करून द्यावीत का ? हा ही खूप जटील प्रश्न आहे . 
मग अंकित च्या प्रश्नाला कसे उत्तर देता येईल . कमी पगारात त्याने पुस्तकं विकत घेऊन आपला खर्च कसा भागवायचा ? 
अंकित ला एक करता येईल , त्याने पुस्तक वाचणाऱ्यांशी  ‘ कनेक्ट ’ व्हावं . एक ‘ ग्रुप ’ त्याने तयार करावा . 
तो ‘ ग्रुप ’ तयार झाला की कुणाकडे कोणती पुस्तकं उपलब्ध आहेत याची यादी करावी व त्यानुसार एकमेकांना पुस्तकं वाचायला द्यावीत . 
या सोबत सर्वांनी महिन्याची ठराविक रक्कम बाजूला काढावी व ती एकत्रित करून कुणाला कोणती पुस्तकं वाचायची आहेत याची यादी करावी . त्या यादीनुसार व महिन्याला जेवढे पैसे जमा झाले आहेत त्यानुसार जिथे स्वस्त पुस्तकं मिळतील तिथून पुस्तकं विकत घ्यावीत . या  सोबत आणखी एक प्रयोग करता येईल , ‘ ग्रुप ’ मध्ये जेवढी पुस्तकं जमतील त्याची कुणाच्या घरी किंवा एखादया सुरक्षित ठिकाणी ‘ लायब्ररी ’  सुरू करावी . 
त्यातून मग आणखी काही उपक्रम घेऊन पुस्तकं गोळा करता येतील . आणि सर्वांना पुस्तकं वाचता येतील .
हे काही पर्याय अंकित ला राबवता येतील , लगेचच त्याला यश मिळेल असे ही नाही . पण चार किंवा पाच मित्र जरी एकत्र आले तरी पुस्तकांचा खर्च विभागता येईल . आणि प्रत्येकाला वेगवेगळी पुस्तकं वाचता येतील तेही कमी पैशात .

तुमच्या कडे काही पर्याय असतील तर जरूर सांगा . 

Comments

  1. खूप छान दादा.....अगदी मनातलं बोलले.... आणि माझं नाव पण अंकीतच आहे

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वा , निव्वळ योगायोग नावाचा .
      धन्यवाद.

      Delete
  2. Ajab Pustakalay hyani kami cost madhye changli pustaka reprint keli ahet..Ajab Kolhapur la samparka kara

    ReplyDelete

Post a Comment

धन्यवाद

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?