एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?
स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात आपल्या देशात प्रचंड प्रमाणात वाढली आहे .
त्यात मोबाईल मध्ये अनेक नवनवे अँप्लिकेशन ही वाढत आहेत . मोबाईल मध्ये जुनेच पण आपला जास्त वेळ खर्च करायला लावणारी अँप्लिकेशन म्हणजे फेसबुक , व्हाट्सअप्प ही दोन अँप्लिकेशन . पण अलीकडच्या काळात टिक टॉक या अँप्लिकेशन मुळे ही अनेकांचा वेळ खर्च होत आहे .
सोबतीला यु ट्यूब सारखे अँप्लिकेशन ही आहेच .
आणि यांच्या वापरामुळे पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे .
त्यामुळे पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे .
दिवसभर जर आपण तीनशे मिनिटे म्हणजे पाच तास फोन वर असू तर आपण यातला एक तास कमी करायला हवा .
आणि त्या एका तासात आपण वाचन केले तर आठवड्यात किमान सात तासांचे वाचन होऊन जाते .
सरासरी साठ पाने आपण दिवसाला वाचले तर आठवड्याला दोनशे पानांचे दोन पुस्तकं सहज वाचून होतील .
म्हणजे वर्षाला १०४ पुस्तकं हे सहज वाचुन होऊ शकतात .
आणि तुम्ही जर वर्षाला शंभर पुस्तकं वाचली तर तुमच्या मध्ये आमूलाग्र बदल होईल .
तुम्ही हा प्रयोग पुढचे तीन किंवा पाच वर्ष केला तर तुमचे तीनशे तर पाचशे पुस्तकं सहज वाचून होऊ शकतात .
आणि एवढी पुस्तकं वाचल्या नंतर तुमच्या मध्ये किती प्रमाणात बदल होऊ शकतो याचा अंदाज तुम्ही हा ब्लॉग वाचत असतानाच लावू शकता .
इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या मोबाईल च्या वापराला विरोध नाहीये , फक्त तुम्ही दिवसभर किती वेळ सोशल मीडियावर असता किंवा टिक टॉक वर असता हे महत्त्वाचे आहे . आणि या मुळे तुमचा किती वेळ वाया जातो हे इथे लक्षात घ्या .
तुम्हाला मोबाईल वर काही पाहायचे असेल तर तुम्ही किंडल ला पुस्तक वाचा किंवा ऑडिओ बुक ऐका .
जो वेळ सोशल मीडियावर जातोय तो कमी करून आणि तो ही एक तास कमी करून तुम्ही आठवड्याला दोन व वर्षाला शंभर पुस्तकं सहज वाचू शकता .
सुरुवातीला पुस्तक वाचनाचा वेग कमी असेल पण साधारण सहा महिन्यानंतर तो तिपटीने किंवा चौपट वाढलेला असेल .
हे मी माझ्या अनुभवातून सांगतो आहे .
मागच्या वर्षी म्हणजे सन -२०१९ मध्ये मी शंभर हुन अधिक पुस्तकं वाचली .
आणि त्याचे प्रमुख कारण मोबाईल चा वापर फक्त एक तासाने कमी केला हे होते .
लॉकडाऊन च्या काळात आपल्या पैकी बरेच जण घरी आहेत , त्यामुळे व्यवस्थित नियोजन केले तर आपण सहज दोन तास काढू शकतो .
म्हणून आपण या काळात पुस्तक वाचन करावे . घरात पुस्तकं असतील तर ती बाहेर काढावीत . शेजारी - पाजारी कुणाकडे पुस्तकं मिळत असतील तर लॉकडाऊन चे पुर्णतः पालन करून त्यांच्या कडून पुस्तकं घ्यावीत .
नाहीतर किंडल वर ती वाचावीत .
मग कधीपासून ह्या प्रयोगाला सूरवात करताय .
या वर्षात तुम्हाला शंभर पुस्तकं वाचनासाठी शुभेच्छा .
#bookksintro

आवडली आयडिया ची कल्पना....
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete