लॉकडाउन च्या काळात ऑनलाईन वृत्तपत्र वाचावी लागली आणि ऑनलाईन पुस्तकं ही .
लॉकडाउन मुळे आयुष्य बदलून गेले आहे . अनेकांना ‘ वर्क फ्रॉम होम ’ करावे लागले , असे काम यापूर्वी कुणीही केले नव्हते .
लॉकडाउन मध्ये पुस्तकांच्या दुकाना बंद होत्या ,आणि त्यामुळे पुस्तकं मिळणे कठीण होऊन बसले आहे . गेल्या दोन महिन्यात पुस्तकं कुणाला ही मिळाली नाहीत .
आणि मग त्याला पर्याय म्हणून काही जण ऑनलाईन पुस्तकाकांडे वळली .
कागदी पुस्तकं आणि ऑनलाईन पुस्तकं यात कोणती चांगली , यासाठी दोन गट पडतील . कागदी पुस्तकं वाचणारा गट नेहमी म्हणतो की आम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात , नवीन पुस्तक हाथी पडल्यावर त्याचा येणारा वास आम्हाला हवाहवासा वाटतो .
पुस्तक वाचत असताना कुठपर्यंत वाचून झाले तिथे पान दुमडने हे ही त्यांना आवडते .
अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं समर्थन कागदी पुस्तकं वाचणारी मंडळी करत असतात .
पण गेल्या दोन महिन्यात वृत्तपत्र सुद्धा उपलब्ध झालेले नाही ,आणि असे अनेक जण आहेत की ज्यांना दररोज वृत्तपत्र वाचायला लागायचे .
किंबहुना रोज दोन किंवा तीन वृत्तपत्र वाचणारे देखील आहेत , पण या लॉकडाउन च्या काळात मात्र या सर्वांनी ऑनलाईन वृत्तपत्र वाचून काढली .
ज्यांना वृत्तपत्र वाचायची सवय आहे व ज्यांच्या घरी दररोज वृत्तपत्र येते ,त्यांना या काळात कागदी वृत्तपत्र मिळाले नाही . पण त्यांनी ऑनलाईन वृत्तपत्र हे वाचलेच . आणि ते वाचताना त्याचे फोटो ही पोस्ट केले .
हे सर्व ‘ वृत्तपत्र लव्हर ’ होते , पण त्यांनी ‘ऑनलाईन पेपर ’ या गोष्टींशी जुळून घेतले . आणि आपले दररोज वृत्तपत्र वाचन सुरू ठेवले .
येणाऱ्या काळात काही प्रमाणात काही लोक ‘ ऑनलाईन वृत्तपत्र ’ वाचण्याकडे वळू शकतील .
या ‘ ऑनलाईन वृत्तपत्रा ’ मुळे सर्वात प्रथम कशाची बचत होणार असेल तर ती पैश्याची होणार आहे . रोज दोन ‘ वृत्तपत्र ’ विकत घ्यायची म्हणली तर दहा रुपये खर्च येतो . तो लगेच ‘ शून्य ’ रुपये होणार आहे . म्हणजे महिन्याला तीनशे रुपये बचत होणार आहे .
बाकी कागदाची बचत किंवा ती रद्दी ठेवण्यासाठी लागणारी जागा हा प्रश्न ही मिटणार आहे , शिवाय ‘ ऑनलाईन वृत्तपत्र ’ कुठून ही आणि कुठे ही वाचता येते .
शिवाय एखादं बातमीचं कात्रण ही कापून जपून ठेवायची गरज नाही .
हे सगळं ‘ ऑनलाईन पुस्तकांना ’ ही लागू होईल . अनेक प्रकारची बचत होईल . हळूहळू लोक ‘ ऑनलाईन पुस्तकांची ’ सवय लावून घेतील .
काळ बदलणार आहे , पुस्तकांचं जग सुद्धा बदलणार आहे .
पुढच्या काळात लोक / वाचक ऑनलाईन पुस्तकाकांडे निश्चित वळतील .
#bookksIntro

Comments
Post a Comment
धन्यवाद