पुस्तकाचे नाव - व्हेन .

...पुस्तकाचे नाव - व्हेन , 

लेखक - डॅनियल पिंक 

हे पुस्तक प्रामुख्याने तुमच्याकडे एनर्जी कधी आणि कोणत्या वेळेत असते याचे भाष्य करते .
लेखकाने ट्विटर च्या ट्विट मधून एक सर्व्हे केला असून त्यात त्याला असे दिसून आले की सकाळी जे लोक ट्विट करतात , ते सकारात्मक असतात .

तर दुपारी जे ट्विट होतात , त्यात नकारात्मकता जास्त आढळून येते .

व जेव्हा रात्र होते तेव्हा पुन्हा सकारात्मक ट्विट दिसून येतात .

या पुढे जाऊन लेखकाने काही सर्व्हे केले असून त्यात त्याने असे मत नोंदवले आहे की सकाळी माणसे जास्त काम करतात , 
आणि त्यांच्या कडे पॉझिटिव्ह एनर्जी ही सकाळी दिसते , 
दुपारच्या वेळेत लोकांमध्ये चिडचिड अधिक प्रमाणात दिसून येते .

.तर पुन्हा रात्री लोक नॉर्मल होतात , आणि जास्त पॉझिटीव्ह काम करतात .

६० ते ८० टक्के लोकांना सकाळी काम करू वाटते , तर उरलेल्या लोकांना रात्री काम करू वाटते .

एडिसन ला रात्री काम करायला आवडायचे .

ज्यांना रात्री काम करायला आवडेल त्यांनी जरूर करावे पण 
रात्री काम करणारे दुसऱ्या दिवशी मात्र चिडचिड करतात .
हे आढळून आलेले आहे .

सलग काम केले तर कंटाळा येतो म्हणून निदान पाच मिनिटे तरी ब्रेक  घ्यावा .
जेणे करून फ्रेश वाटेल .

सकाळी उठल्यावर कॉफी लगेच पिऊ नये , दीड तासानंतर कॉफी प्यावी , 
सकाळी उठल्यावर कॉफी पिणे हे शरीरासाठी चांगले नसते , 

त्याच बरोबर दिवसभरात अधून-मधून कॉफी प्यावी , जेणेकरून तुम्हाला ताजेतवाने वाटेल .

निष्कर्ष - सकाळी जास्तीत जास्ते कामं करून घ्यावीत , 
त्यामुळे दुपारी निगेटिव्ह  विचार मनात  येत नाहीत .

जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे .


Comments

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?