ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

गेल्या दोन ते तीन महिन्यापासून संपूर्ण जगभरात कोविड-१९ ने धुमाकूळ घातला आहे .
जगातील असा एक ही देश आता  राहिलेला  नाही की जिथे कोरोनो बाधित  रुग्ण भेटला नाही .

आपल्या देशाचा विचार करता हा  व्हायरस आपल्या देशात  मार्च महिन्यात आला .
सुरुवातीला तो केरळ मध्ये आला , आणि त्यानंतर तो संपूर्ण देशात हळू हळू पसरला .
आणि मग  त्यानंतर आपल्या देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले , पुढे जाऊन ते वाढवण्यात आले .
या लॉकडाऊन च्या काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला पण त्यातल्या एका महत्त्वाच्या क्षेत्राला फटका बसला ते क्षेत्र म्हणजे पुस्तक प्रकाशन क्षेत्र .

या काळात ऑनलाईन शॉप ही  बंद आहेत ,ज्या  घरपोहोच सेवा द्यायच्या .
 त्याच बरोबर पुस्तकांच्या दुकानाही बंद आहेत .
आणि त्यामुळे अनेक पुस्तक प्रेमींना पुस्तक विकत घेता आलेले  नाही .
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन पुस्तकं विकत घेणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे . अनेकांना बाजारपेठेत जाऊन पुस्तक विकत घेणे शक्य होत नाही ,तर काही जणांची ही अडचण असते की त्यांच्या आसपास पुस्तकाचं दुकानचं नसतं . मग त्यांना फक्त एकाच ठिकाणावरून पुस्तक विकत मिळू शकते , आणि ते ठिकाण म्हणजे ऑनलाईन शॉप .

पण या काळात ते ही घरपोहोच पुस्तकं देऊ शकत नाहीये , आणि त्यामुळे पुस्तक प्रेमींना पुस्तकं घरी मिळणे कठीण होऊन बसले आहे .

अनेकांना दररोज पुस्तक वाचण्याची आवड असते ,रोज वाचलं नाही तर त्याला त्याचा दिवस वाया गेला असे वाटत असते  , अनेक जण असे आहेत की रात्री झोपायच्या अगोदर पुस्तक  वाचल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही .
त्यामुळे हा असा वर्ग आहे की ज्याला पुस्तकाशिवाय एक ही दिवस करमत नाही . त्याला रोज पुस्तक हे वाचायला हवेच असते .

एरवी पुस्तकं घ्यायची म्हणली की सहज मिळायची पण आता लॉकडाऊन  च्या काळात पुस्तक मिळणे कठीण होऊन बसले आहे .

बुकगंगा , बुक्सनामा , अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारखी वेबपोर्टल घरपोच पुस्तकं देत असतात , पण या सेवा सध्या बंद आहेत .

गावोगावी असणारे  किंवा शहरात असणारे ग्रंथालयही या काळात बंद आहेत . त्यामुळे ग्रंथालयातुन मिळणारी पुस्तकं मिळेनाशी झाली आहेत .

शिवाय या काळात घरात बसून असल्यामुळे अनेकांना पुस्तक वाचन करू  वाटत आहे , आणि म्हणून या लॉकडाऊन  च्या काळात ऑनलाईन पुस्तकं वाचण्याचे प्रमाणही  वाढले आहे .

हल्ली जवळ -जवळ सर्वांकडे स्मार्ट फोन आहेत , त्यामुळे एका क्लिक वर अनेक प्रकारची माहिती मिळून जाते .
त्यामुळे पुस्तकं ही सहज मिळून जातात .
अनेकांनी या काळात मोठ्या प्रमाणात वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की मराठी भाषेत पुस्तकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे .

पण तेच जर ऑनलाईन बघायला गेलं तर ई - पुस्तक म्हणावी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत .

अजूनही मराठी पुस्तकं यात मागे आहेत , तुम्ही जर किंडल सारखे मोबाईल अँप्लिकेशन जर तुमच्या मोबाईल मध्ये घेतले तर इंग्रजी भाषेतील सर्वाधिक इ- पुस्तक या मोबाईल अँप्लिकेशन वर उपलब्ध आहेत .
मराठी मध्ये ई -पुस्तकं ही फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत , आणि जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्यातली अनेक पुस्तकं ही लोकांनी वाचलेली असतात .
उदाहरण द्यायचे झाले तर मृत्यूजयं , स्वामी , किंवा वपु काळे यांची पुस्तकं घेतली तर असे दिसून येईल की वाचकांनी ही पुस्तकं वाचलेली असतात .
आता त्याला नवीन पुस्तकांचे वाचन करू वाटते .आणि मग तो अमेझॉन किंडल सारख्या वेबसाईटवर जातो किंवा मोबाईल अँप्लिकेशन वर जातो . आणि मग तिथे त्याचा भ्रमनिरास होतो .त्याला जी पुस्तकं हवी असतात ती मिळतच नाहीत .
याच्या तुलनेत , हिंदी व इंग्रजी पुस्तकांचा विचार केला व अमेझॉन किंडल किंवा जुगरनॉट सारख्या मोबाईल अँप्लिकेशन चा विचार केला तर तिथे असंख्य प्रमाणात ई– पुस्तकं उपलब्ध असतात .
आणि त्याच्या उलट परिस्थिती ही मराठी पुस्तकांची असते .
इंग्रजी मध्ये एक वेळ पेपरबॅक पुस्तक उपलब्ध नसेल पण ई – पुस्तक  हे उपलब्ध असते . आणि ते नसेल तर ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो .

ई- पुस्तकाबरोबर ऑडिओ पुस्तक हा प्रकार  अलीकडच्या काळात चांगलाच  प्रसिद्ध होत आहे , प्रवासात किंवा काही काम करत असताना लोकांना या प्रकारची पुस्तकं ऐकू वाटतात .  आणि हा नवा प्रकार ही इंग्रजी व हिंदी मध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे .

मराठी पुस्तकांत ते ही प्रमाण कमी आहे , आणि जे काही ऑडिओ स्वरूपात पुस्तकं उपलब्ध आहेत ते ही अनेक पुस्तकप्रेमींनी वाचलेली असतात .
म्हणून तिथे ही निराशाच हाथी लागते .

लॉकडाउन च्या काळात अनेकांना पुस्तकं वाचायची होती पण मनासारखे पुस्तकं वाचायला न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला .
मराठी बोलणारी लोकसंख्या ही सुमारे अकरा ते बारा कोटीच्या घरात आहे , त्यात ही मराठी पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या नेमकी किती  हे सांगणे कठीण आहे  गोष्ट आहे .
मुंबई किंवा पुण्यात अनेक मराठी बोलणारे हे आवर्जून इंग्रजी पुस्तकं वाचतात  . त्यात त्यांची काही चुकी नसते , त्यांचे शिक्षणच हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झालेले असते . आणि त्यामुळे मराठी असून ही त्यांचा कल हा इंग्रजी पुस्तकाकांडे असतो .
त्यामुळे मराठी पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या अजून कमी होते .

या व अशा अनेक अडचणी मराठी पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांना निश्चितच आहेत , पण तरीही येत्या काळात स्मार्ट फोन चा वापर हा खूप वाढणार आहे .
एका क्लिक वर बरेच काही उपलब्ध होणार आहे , त्यात वाढणाऱ्या कागदाच्या किंमती व त्यामुळे वाढणाऱ्या पुस्तकांच्या किंमती या वाचकांना अडचणीच्या ठरू शकतात .
आणि म्हणून येणाऱ्या काळात मराठी वाचणारे पुस्तकप्रेमी ई -पुस्तकाकांडे वाचनासाठी वळू शकतात पण तिथे ही त्याला नवीन पुस्तकं ई - पुस्तक स्वरूपात नसतील तर तो इंग्रजी किंवा हिंदी पुस्तकाकांडे वळल्याशिवाय राहणार नाही .

शिवाय नवीन पिढीकडे आता मोबाईल आहे , त्यांना पुस्तक वाचणं किंवा ते सोबत बाळगणं आवडणार  नाही .
त्यांना सगळं काही एका क्लिकवर  हवे आहे ,  शिवाय पुस्तकं ज्याप्रकारे हाताळावी लागतात व त्यासाठी जेवढी जागा लागते ते पाहता ई -पुस्तकं ही त्यांना हाताळायला सोपी वाटतील .
म्हणून असे वाटते की येणारा काळ हा ई -पुस्तकांचा असेल .
आणि हा बदल मराठी पुस्तकांना लागू असेल .

Comments

  1. हा प्रयत्न www.esahity.com वरून चालू असतो. तरीही इंग्लीशच्या मानाने तोकडेच.

    ReplyDelete
  2. पुस्तकाबद्दल सर्वकाही माहिती हवी आहे?तर मग subscribe करा.माझ्या चॅनल ला👇🏻
    https://www.youtube.com/channel/UCNFfWUWgtLNuKOS4qqL9eug

    ReplyDelete
  3. अशी कोणती साईट आहे का, जिथे सगळे इ-पुस्तके सहज उपलब्ध होतील???

    ReplyDelete

Post a Comment

धन्यवाद

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?