जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.




पुस्तक वाचनाची बैठक / सवय ही  प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते , आणि तशी ती असतेही .  काहींना  सकाळी – सकाळी उठून पुस्तक वाचू वाटते तर काहींना रात्री झोपायच्या अगोदर पुस्तक वाचायला लागते .  
म्हणजे ते लागतेच . 
काहींना प्रवास करताना पुस्तक वाचायला आवडते . तर काही जण  असे ही असतात जे टॉयलेट मध्ये कमोड वर बसून पुस्तक वाचून काढतात . अर्थात ही प्रोसेस भयानक आहे .
 या पद्धतीने तुम्ही  वाचत असाल तर तुमच्या पचन संस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो . पोट साफ न  होण्याची समस्याच तुम्हाला होऊ शकते . 

अनेक मोटीवेशनल वक्ते असे म्हणतात की जी मोठी लोक आहेत म्हणजे मोठ्या कंपनीचे  मालक आहेत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्यांना सकाळी पुस्तकं वाचायची सवय असते . 
सकाळी व्यायाम झाला की थोड्या वेळ ते पुस्तक वाचतात व त्यानंतर कामावर हजर होतात . 
ही सवय चांगली मानली जाते , तुम्ही सकाळी पुस्तक वाचत असाल तर तुम्ही दिवसभर ‘ फ्रेश ’ राहता . 
जसे शरीरासाठी सकाळी व्यायाम आवश्यक असतो , आणि तो रोज केला तर तुम्हाला किती फ्रेश वाटते याचा अनुभव तुम्हाला असेलच . 
पुस्तक वाचनाचे ही तसेच आहे , सकाळी शरीरासाठी व्यायाम आवश्यक तर बुद्धीच्या व्यायामासाठी पुस्तक वाचन चांगले . 
म्हणून शक्यतो सकाळी पुस्तक वाचन करण्याचा प्रयत्न करावा . 
सकाळचे वाचन तुम्हाला वर सांगितलेल्या प्रमाणे दिवसभर फ्रेश ठेवते . तुम्ही नोकरी करत असाल किंवा कोणताही व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही विद्यार्थी असाल तर सकाळचे पुस्तकं वाचन कधीही चांगले . 

पण सकाळच्या वाचनाला महिलांना अडचण होऊ शकते , त्याचे कारण ही आहे . आणि ते कारण म्हणजे जर एखादी महिला नोकरी करणारी असेल तर  तिला घरातील बरेच कामं ही करायची असतात . आणि मग तिला यातून वेळ काढणे कठीण जाते .आणि एखादी महिला नोकरी ला नसेल , तरीही सकाळी कामाचा व्याप तिच्या मागे भरपूर असतो .

 तरीही प्रत्येक स्त्री ने पुस्तक वाचनाचा प्रयत्न हा केलाच पाहिजे . सकाळी वेळ काढणे कठीण असेल तर दिवसभरात वेळ काढून पुस्तक वाचावे . पण ते वाचावेच . 

काहींना रात्री झोपायच्या अगोदर पुस्तक वाचायला लागते , आणि ते वाचल्या शिवाय अनेकांना झोप येत नाही . ज्यांना ही सवय आहे त्यांनी पुस्तक जरूर वाचावे पण रात्री च्या झोपेचे काय ? जर झोप व्यवस्थित झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोच . पण पुढच्या दिवशी आपण काम करतो त्यावर ही होतो . त्यामुळे ‘ लेट नाईट ’ वाचन नकोच . 
मुळात झोपण्याचाच प्रयत्न लवकर असला पाहिजे . सकाळी लवकर उठून जास्तीत जास्त पुस्तक वाचन करण्याचा प्रयत्न करावा . 
तेच आपल्यासाठी उपयुक्त असते . 

प्रवासात वाचन ही चांगलेच , आपण या वेळेचा सदुपयोग असा करत असू तर उत्तमच . 
अनेकांना कामाच्या घाईत पुस्तक वाचनासाठी वेळ मिळत नाही . त्यांनी प्रवास करताना जरूर वाचन करावे . 
तुम्ही बस मध्ये असाल , तुम्ही ट्रेन मध्ये असाल ,( मुंबई च्या ट्रेन मधील गर्दीत ही गोष्ट थोडी अवघड आहे . पण माझ्या पाहण्यात काही लोक आहेत , जे जागा मिळाली की वाचन करतात . काहीजण उभे राहून सुध्दा वाचन करतात . मुंबईतील लोकल मध्ये वाचन करणाऱ्या वर वेगळा ‘ ब्लॉग ’ लिहावा लागेल .) किंवा तुम्ही एखाद्या छोट्या गाडीत असाल तर तुम्ही पुस्तक वाचन करू शकता .
पण पुन्हा एक प्रश्न इथे उदभवतो तो असा की आपण प्रवास करत असतो तेव्हा आपल्या बाजूला किती तरी गोष्टी घडत असतात . आपण त्यांचे निरीक्षण करण्याऐवजी पुस्तक वाचन करणे कितपत योग्य आहे . 
समजा तुम्ही कोकणात समुद्र किनारी प्रवास करत असाल आणि तो नितांत सुंदर समुद्र बघायचे सोडून तुम्ही पुस्तक वाचत असाल तर , तुम्ही नैसर्गिक सौंदर्यं पाहण्याला मुकत आहात . 
आणि तुम्ही जर मुंबई च्या लोकल मध्ये प्रवास करत असाल तर , तर तुम्ही लोकल मधील माणसांचे  निरीक्षण करणे आवश्यक आहे . लोकल मधील प्रत्येक माणूस हा पुस्तक असतो . तो वाचणं ही गरजचे आहे नाही का ? 

वर लिहलेले वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल , गोंधळात पडू नका . जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . 
पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या . 
त्यासोबत आरोग्याची ही काळजी घ्या .

#bookksintro


Comments

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?