डोंगरी ते दुबई
डोंगरी ते दुबई
मुंबई च्या 60 वर्षातील गुन्हेगारी क्षेत्राचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे ,.
50 च्या दशकात मुंबई कशी होती .
मुंबई चा पहिला डॉन कोण ?
तर दाऊद दुबई ला कसा गेला तिथून तो कराची ला कसा पोहचला .
अरुण गवळी , मन्या सुर्वे अशा अनेक डॉन ची कथा या पुस्तकात आहे .
पहिल्या ओळी पासून हे पुस्तक तुमचा ताबा घेतं , पुढे काय - पुढे काय याची उत्सुकता लागत राहते .
93 च्या बॉम्ब स्फोटा नंतर दाऊद मुंबई त परत येऊ इच्छीत होता , त्याला कुणी आडवले .
छोटा राजन वर हल्ला कसा झाला . छोटा शकील कोण होता .
मुंबईत गॅंग वार कसं झालं , ते कुणी घडवून आणलं . दाऊद चा त्यात काय रोल होता .
अबू सालेम कसा घडला . कसा डॉन झाला , त्याला पकडून कसे आणले .
मन्या सुर्वे सर्वात हुशार आणि वाचक होता . अनेक कादंबऱ्याच वाचन त्याने केलं होतं .
70 च्या दशकात बॉलीवूड मधील सिनेमात गुन्हा घडल्यावर पोलीस उशिरा पोहचू लागली असं चित्रण दाखवू लागले ते का याच खरं कारण या पुस्तकात आहे .
बॉलीवूड ला दाऊद ने आपल्या इशाऱ्यावर कसं नाचवले .
त्यांच्या पार्टीला कोण कोण हजर होते .
दाऊद चा प्रेमभंग झाल्यावर तो सैर भैर कसा झाला .
नेते , मंत्री , अधिकारी , पोलीस अधिकारी यांचे दाऊद शी कसे संबध होते . ते सर्व यात आहे .( जे पुढे कधी ही सिद्ध नाही होऊ शकले )
गुटखा किंग दाऊद ला कसा भेटला . दाऊद ने मांडवली कशी केली .
फोर्ब्स च्या यादीत , दाऊद मुकेश अंबानी यांच्या पेक्षा पुढे होता ,
पाकिस्तान ला समांतर आर्थिक व्यवस्था दाऊद ची आहे .
आपला बाप एक इमानदार पोलीस होता , स्वतः दाऊद 6 वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून शिकला .
मग पुढे असं काय झालं की तो , अमेरिकेच्या हिट लिस्ट वर आला .
त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले .
असं सर्व काही या पुस्तकात आहे .
एकदा वाचाच .

Comments
Post a Comment
धन्यवाद