पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

 

आयुष्यात तुम्हाला खूप खूप पुस्तकं वाचायची असतात , इतर कुणी मित्र , किंवा फेसबुकवरचा  मित्र आणि त्याचे पुस्तक वाचून झाल्यावर त्याने पुस्तकाबद्दल फोटो पोस्ट केला किंवा कुणी तरी तुम्हाला अमुक तमुक पुस्तक वाच म्हणून सांगितले तर तुम्हाला ते पुस्तक वाचू वाटते . 

पण खरी अडचण यापुढे येते . तुम्ही अनेक कारणं सांगत राहता आणि तेच काय पण कोणतंच पुस्तकं वाचत नाही .

असे काही दिवस किंवा वर्ष निघून जातात तुम्ही एक पण पुस्तक वाचत नाहीत . 

या काळात ज्याला आवड असते , त्याला सवड असते . असं म्हणत तुमचा एखादा मित्र या काळात प्रचंड पुस्तकं वाचून काढतो . 

ही गोष्ट तुम्ही ही करू शकला असता , पण तुम्ही फक्त बहाणे शोधत राहता . 
तुम्हाला कुणी विचारले  तुमचे तर पहिलं उत्तर असते , मला वेळच मिळत नाही . 
जगातील एक श्रीमंत माणूस बिल गेट्स जेव्हा वर्षाला ५०-५५ पुस्तकं वाचून काढतो तेव्हा त्याला मिळालेले २४ तास हे आपल्याला पण मिळालेले असतात .
किंबहुना या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक माणूस हा २४ तास किंवा २४ तासाचा एक दिवस घेऊन येत असतो . 

तो त्यापुढे कधी ही कमी किंवा जास्त होत नाही , त्याच्या आयुष्यभर वेळ हा जेवढा असतो तेवढाच राहतो . 
मग मी का पुस्तक वाचत नाही हे आपण का सांगत राहतो . 

आठवड्याला २०० ते ३०० पानी एक पुस्तक वाचून काढलं तर महिन्यात ४ पुस्तकं वाचून होतात , म्हणजे वर्षाला ५२ पुस्तकं . 
जेव्हा तुम्ही ५२ पुस्तकं वर्षाला वाचता तेव्हा तुम्ही थेट बिल गेट्स च्या पंक्तीत येऊन बसता . 

दिवसाला सहज ३० मिनिटे तुम्ही पुस्तक वाचनासाठी काढू शकता . 

म्हणून कारणं सोडा आणि पुस्तकं  वाचत राहा .





 (  पुस्तकं आपल्याला बरेच काही हे निस्वार्थीपणे देत असतात , आपण त्यांच्या कडून घेत राहिले पाहिजे . आयुष्यात आलेल्या कठीण किंवा गोड प्रसंगात पुस्तकं ही नेहमी आपल्याला साथ देत असतात . पुस्तकं आपली खरे मित्र असतात . ) 

Comments

Post a Comment

धन्यवाद

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?