.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे
.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे
धोनी नेमका घडला कसा ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी शोधायचा प्रयत्न केला आहे . हे पुस्तक त्याचाच शोध घेते .
शेवटच्या दोन बॉल वर १२ धावा लागत असतील आणि त्या वेळेस त्याच्या मनाची अवस्था काय असेल ? तो काय विचार करत असेल . त्याच्या मनात किती काहूर माजले असेल .
हे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात . मोक्याच्या व कठीण समयी तो एवढा कसा कुल राहू शकतो . आपण त्याच्या सारखे का वागू शकत नाही . किंवा इतर खेळाडू धोनी सारखे का वागू शकत नाहीत . खरंतर या प्रश्नाचे उत्तर धोनीच देऊ शकतो .
लेखिकेने ते शोधण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केला आहे . आणि बऱ्याच अंशी धोनी कडून ह्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली आहेत .
पुस्तक एकूण पाच भागात आहे .
■ योग्य मनोभूमिका
■ गोल
■फॉलो द प्रोसेस
■ अ पिसफुल वॉक होम
■ टू बी द चोझन लीडर .
● यशोमार्गात जवळपास ७०% श्रेय मानसिक कोशल्याचं असतं .उरलेलं ३०% श्रेय उपजत आणि प्राप्त केलेल्या प्रतिभेचं असतं .
● आयुष्य जर सरळ आणि साधं असेल तर त्यात गुंतागुंत कशाला करायची .
● धोनी ला एका खेळाडू बद्दल प्रश्न विचारण्यात आला , तेव्हा त्याचे उत्तर असे आले , ‘ फॉर्म ’ कुणीही पाहिलेला नाही . ती मनाची एक अवस्था असते , ज्यात तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असता आणि अत्यंत सकारात्मकपणे विचार करता .
● मानसशास्त्र तुम्हाला हेच सांगेल . परिस्थिती सर्वांसाठी सारखीच असते , पण प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते . ‘ परफार्मर ’ आणि ‘ नॉन – परफॉर्मर ’ यांच्यातील मुख्य फरक हाच असतो .
● अनेक क्रिकेट गुरू क्रिकेट मधील फटक्याविषयी अनेकदा बोलताना दिसतात . पण धोनी कडे पाहिले की वाटते कौशल्यापेक्षा मनोवृत्ती महत्वाची .
● जेव्हा तुम्ही एखादा फटका अचूक मारता तेव्हा त्याच्या मागे किमान १०० बॉलचा सराव केलेला असतो .
आणि म्हणून हेलिकॉप्टर शॉट सहज बसतो .
● मेहनत न करता असणारा आत्मविश्वास हा फसवा असतो आणि त्यामुळेच अपयश येते .
● तुम्हाला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा त्या संधीचे सोने करा .
धोनी हे नेहमी करून दाखवतो .
● धोनीकडे जेव्हा बॉल येतो तेव्हा तो कोण फेकतोय हे मला दिसत नाही , मला फक्त बॉल दिसतो .
● धोनी कडे नेहमी ध्येय होते , जर तुमच्याकडे ध्येय नसेल तर तुमचं आयुष्य इतरांची ध्येयं साकार करण्यात व्यतीत होईल .
● धोनीला कायम अल्पकालीन ध्येय ठरवायला आवडते , २०११ च्या फायनल वर त्याचे कधीही लक्ष नव्हते , एक – एक सामना जिंकत फायनल ही जिंकायची असा साधा प्लॅन त्याच्याकडे होता .
● वीस ओव्हर मध्ये जर २०० धावा लागत असतील तर सामना जिंकण्यासाठी काय करावे लागेल तर तो साधा प्लॅन आखतो . २० चौकार मारले तर ८० धावा होतात , आता १०० बॉल मध्ये १२० धावा लागतात .
या प्लॅन च्या जोरावर त्याने अनेक सामने जिंकून दिले आहेत .
● तुम्ही ध्येय ठरवता तेव्हा तुम्ही त्याची वाटचाल कशी करता हे महत्त्वाचे आहे .
● जर संधी दार ठोठावत नसेल , तर संधी निर्माण करा .
● अति विचार बंद करा .
● भीती दूर सारा . आपल्या कार्यात भीतीला दूर सारा .
● नैराश्य , भीती मनासारखं घडत नसेल तर अलिप्तता पाळावी .●
● आवश्यक ओझे वागवण्यात काय अर्थ आहे .
● शांत राहा . जो माणूस शांत राहू शकत नाही तो आणीबाणीच्या प्रसंगी काही कामाचा नसतो .
● तुम्ही जर सिंह असाल तर स्वतः ला सिंह म्हणा .
● मी दडपण ही उत्तम कामगिरी करण्याची संधी मानतो . तुम्ही जर दडपणाखाली असाल तर तुम्ही त्याकडं धोका म्हणून पाहता कामा नये आणि त्याला शरण जाता कामा नये .
● धोनीकडे पाहून वाटते की हे आयुष्य एकदाच मिळते ते सार्थकी लावण्याचा प्रयत्न करा .
#bookksintro

Comments
Post a Comment
धन्यवाद