पुस्तकांच्या दुकाना कधी सुरू होणार ?


मार्च महिन्यापासून आपल्या देशात संपूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले , हा ब्लॉग लिहीत असेपर्यंत अजून तरी सगळ्या देशात लॉकडाउन आहे . 

आणि पुढच्या काळात देखील लॉकडाउन काही काळासाठी वाढेल असा अंदाज आहे . 
काही राज्य सरकारने तो लागू करावा म्हणून केंद्रसरकार कडे तशी मागणी ही केली आहे . 
हा ब्लॉग लिहीत असेपर्यंत ५० दिवसांचा लॉकडाउन पूर्ण झाला आहे . आणि या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना सोडून सर्व काही बंद होते . 
आणि त्यात पुस्तकांची दुकानं ही आली . केंद्रसरकारने पुस्तकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते . 
त्यामुळे या काळात पुस्तकांची दुकानं पूर्णपणे बंद राहिली . 
आणि त्याचा फटका पुस्तकवाचन करणाऱ्या वाचन प्रेमींना बसला . 
गेल्या आठवड्यात दारूच्या दुकाना सुरू करण्याचा आदेश आला , आणि त्या सुरू ही झाल्या . 
आपण दारू विकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या ही पाहिल्या . दारूच्या दुकानावर चर्चा ही खूप झाली . 
दारू पासून किती महसूल मिळतो याची प्रचंड चर्चा झाली . दारूवरचे विनोद ही सोशल मीडियावर खूप गाजले .
पण त्याच बरोबर वाचन प्रेमींनी मग पुस्तकांच्या दुकाना का सुरू नाही ? केल्या याची चर्चा सुरू झाली . ( इथे आपण शालेय पुस्तकासंबंधी बोलत नाही आहोत .) 
पुस्तकांच्या दुकानांही सुरू कराव्यात म्हणून मागणी वाढली . 

केरळ मध्ये पुस्तकांच्या दुकाना सुरू झाल्या असून आठवड्यातून दोन दिवस दुकाना ह्या सुरू राहतील असे ही सांगण्यात आले आहे . अर्थात लॉकडाउन चे सर्व नियम पाळायची आहेत . 
पुस्तकप्रेमी सर्व नियम पाळतील .ते कुठे ही तोडणार नाहीत . आणि पुस्तकं विकत घेण्यासाठी दारूच्या दुकाना समोर जश्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तशा लांब रांगा लागण्याची शक्यता ही कमी आहे . 
दिल्ली येथे काही प्रमाणात पुस्तकांच्या दुकानां उघडण्यात आल्या , पण तिथल्या दुकानदारांनी सांगितले की पुस्तकं विकत घेण्यासाठी कुणी आलेच नाही . 
पण हळू हळू पुस्तकप्रेमी ची पावले दुकानाकडे वळतील . 
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लवकर पुस्तकांच्या दुकाना सुरू व्हाव्यात . पुस्तकप्रेमींना पुस्तकं वाचायला मिळोत . सरकार या बाबतीत लवकर निर्णय घेईल ही अपेक्षा आहेच , पण आम्ही पुस्तकप्रेमी म्हणून सर्व नियमांचे पालनही करू . 

#bookksintro

 

Comments

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?