कोरोनो व्हायरस च्या काळात काय करता येईल.
साधारण 2 महिन्यांपूर्वी आम्ही काही मित्र कोरोनो बद्दल बोलत होतो . तेव्हा सर्वांचे एकमत असे झाले होते की कोरोनो आपल्या देशात हाथ-पाय पसरणार नाही .
आपल्या कडे आला तरी तो फार मर्यादित म्हणजे चार-पाचशे च्या घरात राहील .
पण आजची आकडेवारी ही वेगळंच सांगत आहे .
चिंताजनक अशी परिस्थिती होऊन बसली आहे .
चीन पुरता हा व्हायरस राहील .
असे ही आम्हाला त्यावेळी वाटले होते .
पण आता संख्या झपाट्याने वाढत आहे .प्रत्येक चोवीस तासात आकडे वाढत चालले आहेत . रात्री अपडेट घेतले तर दुसऱ्या दिवशी सकाळी हा आकडा खूप वाढलेला दिसून येतो .
लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांनी थोडी काळजी घ्यायला हवी होती , पण लोक कसलीही तमा न बाळगता फिरत राहिली .
घर सोडून कुठे ही जाऊ नका सांगितले असताना ही अनेकांनी आपआपली घरे काहीही कारण नसताना सोडली .जी गोष्ट टाळायला हवी होती तीच मोठया प्रमाणावर लोक करून बसले .
त्यातून नको त्या गोष्टींसाठी गर्दी होत राहिली .
पुढच्या काळात आता हा आकडा किती पर्यंत जातोय हे आता सांगणे कठीण आहे .
पण अजून ही वेळ गेलेली नाही . लोकांनी घरात बसने गरजचे आहे .
मान्य आहे की तुम्हा - आम्हाला आता वीस दिवस तरी होत आले असतील घरात बसून राहिलेले .
पण त्याला पर्याय नव्हता .
आणि पुढच्या काळात ही तो नाही .
अजून किती दिवस घरात बसावे लागेल , ये सांगणे आता कठीण आहे . पण जितका तो कालावधी असेल तेवढा काळ लोकांनी घरात बसावे .
होता होईल तेवढी गर्दी टाळावी . दुकानदार घरपोहोच देत असेल तर वस्तू घरीच मागून घ्याव्यात .
अजून ही काही ठिकाणी सोसायटी मध्ये लोकांच्या पार्ट्या सुरू आहेत . त्या त्यांनी त्वरित थांबवाव्यात . आपलं घर सोडू नये .
या कालावधीत ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या पण जमल्या नाही त्या तुम्ही करा .
कुणाला कसले छंद असतील तर ते घरात बसून करता येतील का बघा .
कॅरम , चेस बाहेर काढा .
कुणाला चित्र काढायची असतील तर ती काढा .
पुस्तक वाचन करा . लिहायचे असेल तर लिहा .
व्यायाम करा .
ही योग्य वेळ आहे तुमच्या छंदाला वेळ देण्यासाठी .
वेळेअभावी राहून गेलेल्या गोष्टी या काळात तुम्ही करा .
घरातील लहान मुलांना वेळ द्या , लहान मुले नसतील तर मोठ्यांशी बोला . चर्चा करा . सवांद वाढवा .
गेल्या काही वर्षात सवांद कमी होत आहे आपल्या घरात .
या निमित्ताने तो वाढवण्याचा प्रयत्न करा .
कामाच्या रहाटगाडग्यात अनेकांना फोन करने ही जमत नाही तो करून पहा .
आपल्या जवळच्या लोकांशी बोला . त्यांच्याशीही फोन वर संवाद साधा .
या काळात पुस्तकं आपली चांगला मित्र होऊ शकतात . घरात पुस्तकं असतील तर ती बाहेर काढा .
त्यातली काही पुस्तकं परत वाचा .
पुस्तकं नसतील तर अमेझॉन किंडल सारखी मोबाईल अँप्लिकेशन घ्या .
या काळात पुस्तकाबद्दल घरातील लोकांशी चर्चा करा .
फेसबुकवर असाल तर तिथे मी वाचलेले पुस्तक म्हणून पोस्ट करा .
कुणाला रेसिपीजची आवड असेल तर या काळात त्याही करा .
कोरोनो शी लढताना आतापर्यंत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आणि ती म्हणजे जगभरात अजून या व्हायरस ची लस सापडलेली नाही , यावर अहोरात्र काम सुरू आहे . आज ना उद्या ती शोधली जाईल पण तोपर्यंत आपण काळजी घेणे गरजेचे आहे .
जगाच्या निर्मिती पासून माणूस फक्त आणि फक्त युद्ध करत राहिला ,पण आरोग्य या महत्त्वाच्या गरजेकडे तो दुर्लक्ष करत गेला
संपूर्ण जग नष्ट होईल , पुथ्वी वरील सगळी मानव जात काही क्षणात नष्ट होईल एवढा दारुगोळा , बॉम्ब माणसाने तयार करून ठेवले आहेत .
अनेक वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ विमाने आपल्याकडे आहेत, मानवरहित लढाऊ विमाने ही आपल्याकडे आहेत .
पण दहा टक्के माणसाला वाचवू शकतील एवढे ही मानव जातीकडे औषधे नाहीत .
दर दोन पाच वर्षाला नवीन व्हायरस येतो .आपल्या कडे लगेच लढण्यासाठी औषधे नाहीत पण एखाद्या देशाने हल्ला केला तर आपल्याकडे लढण्यासाठी रणगाडे आहेत , आधुनिक विमाने आहेत . पण औषधे नाहीत .
येणाऱ्या काळात आरोग्य ही सेवा कशी भक्कम करता येईल यावर मोठे काम करावे लागेल .
किंबहुना आरोग्य व शिक्षण या दोन प्रमुख मागण्या लोकांच्या असल्या पाहिजेत .
एकदा का ह्या दोन मागण्या लोकांनी प्रामुख्याने मांडल्या की राजकारणी देखील या गोष्टी कडे लक्ष देतील . येणारा काळ हा फार कठीण आहे .
पण त्यावर आपण नक्कीच मात करू . कोरोनो हा आपण हरवू .
गेल्या महिन्याभरात काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आहेत का ?
आपल्याला जीवनावश्यक जेवढे गरजेचे आहे आणि त्यावर आपण जगू शकतो . तेवढंच खरंतर माणसाने कमवायला हवे होते .
पण माणूस चुकीच्या दिशेने जात राहिला आणि म्हणून त्याच्यावर ही वेळ आली .
खरंतर त्याने ती ओढून घेतलीं....
क्रमशः ..


Comments
Post a Comment
धन्यवाद