पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?
.
.....पुस्तक वाचन ही प्रक्रिया खूप कंटाळवाणी असते का ? किंवा माणसापासून दूर घेऊन जाणारी असते का ?
हा प्रश्न अनेकदा पुस्तकं वाचन करणाऱ्या पुस्तकं प्रेमींना पडत असतो . आणि तो यासाठी की पुस्तकं वाचत करत असताना वाचणारा इतका गढून जातो की त्याला इतर काही कामं असतात याचा पण विसर पडत जातो . किंबहुना त्याला ती कामं च करू वाटत नाहीत .
तुम्ही हॅरी पॉटर वाचत असाल आणि तेवढ्यात तुम्हाला घरातील व्यक्तीनें काही वस्तू बाहेरून आणायला सांगितली तर तुमची यावर काय ‘ प्रतिक्रिया ’ असेल ?
किंवा तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांचे सतत फोन येत असतील , आणि ते फोन कुणाच्या तरी वाढदिवसाच्या ‘ पार्टीला ’ जाण्यासाठी असतील तर .
पुस्तकंप्रेमी हे जाण्याचं रद्द करून आपल्या पुस्तकात गढून जाणे पसंद करेल . तो पुस्तकात इतका गुंतलेला असतो की त्याला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो .
,एखादी कादंबरी वाचत बसलेला असताना जर त्याला काही काम सांगितले असेल तर तो त्या कामाकडे दुर्लक्ष करेल किंवा ते काम उद्या वर तरी पुढे नेईल .
अनेकदा वाचन प्रेमींना पुस्तकं वाचनाव्यक्तिरिक्त कोणतेही काम नको वाटते .
अनेकांना हा अनुभव आला असेल बऱ्याचदा आपण इतके पुस्तकवाचनात गढून जातो की यातल्याच जगात रमून जावेसे वाटते . पुस्तकातील पात्रे आपल्याला भुरळ घालतात . आपण त्या पात्रांच्या प्रेमात पडतो . ती पात्रे ही हवी-हवीशी वाटतात .
आणि मग आपल्याला इतर कामं करू वाटत नाहीत पुढे जाऊन या कामांचा ही कंटाळा येत जातो आणि मग आपल्यावर कंटाळवाना हा शिक्का बसतो .
हा बसलेला शिक्का अर्थात आपल्याला आवडत असतो . पुस्तक वाचन करणे ही प्रक्रिया एका जागेवर तासनतास बसून ठेवणारी असते . अनेकदा पुस्तक वाचन करताना आपल्यात एका प्रकारची ऊर्जा ही संचारत असते , पण त्यांचे रूपांतर अजून पुस्तकं वाचन करण्यात होते . आपण पुस्तक वाचायला बसलो की आपल्याला उठवतच नाही . मग परत आपल्याला कंटाळा यायला लागतो . आणि पुन्हा शिक्का हा ठरलेलाच असतो .
आता आपण दुसऱ्या मुद्याकडे जाऊ आणि तो दुसरा मुद्दा असा आहे की आपण पुस्तकवाचनामुळे माणूसघाने होतो का ?
हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे कारण पुस्तक वाचणारा जर दिवसाला चार किंवा पाच तास पुस्तक वाचन करत असेल तर त्याचा माणसाबरोबर चा संपर्क च कमी होत जातो .
त्यात पुस्तकातील पात्र त्याला खऱ्या जगात येऊ देत नाहीत . कारण खऱ्या जगातील पात्र त्याच्या मनासारखी नसतातच कधी . मग त्याला पुस्तकातील पात्र खरी वाटू लागतात . ती पात्र त्याला आणखी ओढत घेऊन जातात , आणि मग पुस्तक वाचनाचा ही वेग वाढतो . पुस्तकं वाचनासाठी लागणारी बैठक तयार होत जाते व तिचा कालावधी ही वाढत जातो . काहीजण तर दिवस-दिवसभर पुस्तकं वाचत असतात .
आणि मग पुस्तकं वाचणाऱ्याला इतर माणसांना वेळ देणं शक्य होत नाही . किंवा त्याला तो वेळ देऊच वाटत नाही . आणि तो वेळ का द्यायचा हे पुस्तक विचारत राहते . पुस्तकातील पात्र ही खरी-खुरी वाटायला लागतात . ती सच्ची वाटायला लागतात . आणि खऱ्या आयुष्यातील माणसे पुस्तकात असतील तशी असतीलच याची वाचणाऱ्याला खात्रीच नसते . मग तो आणखी पुस्तक वाचनात रमत जातो . पुस्तकवेडा तो होत जातो . आणि मग त्याला माणसांना भेटायचा, बोलायचा कंटाळा येऊ लागतो . तो कंटाळवाना होत जातो .
पुढे जसजसे त्याचे वाचन वाढत जाते , त्याचा वाचन कालावधी वाढत जातो . त्याच पुस्तकांवरच प्रेम वाढत जाते . आणि तो पुस्तकवेडा होतो तसा तो माणूसघाना पण होत जातो .
अर्थात याला थोडे पुस्तक प्रेमी अपवाद पण आहेत , पण पुस्तकं वाचणारा हा माणूस घानाच असतो .
बघा तुम्हाला पटतंय का ?
#bookksIntro

Comments
Post a Comment
धन्यवाद