ट्विटर - यांनी जग बदललं - लेखक - अतुल कहाते .



ट्विटर  – यांनी जग बदललं
- लेखक – अतुल कहाते
- मनोविकास प्रकाशन .
संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या १४० शब्दांची रचना  असलेल्या ट्विटर ची ही गोष्ट आहे .
आता साधारण सगळ्यांना ट्विटर बद्दल माहिती झाले असेल आणि त्याची काय किमया आहे याची ही सर्वांना जाणीव असेल .
ट्विटर हे एक सोशल अँप आहे , त्याच्या सोबतीला फेसबुक किंवा व्हाट्सअप्प हे सुध्दा सोशल अँप आहेत .
पण जी कमाल ट्विटर करू शकते ते इतर अँप नाही करू शकत .
आपलं मत किंवा एखादा संदेश जर कुणापर्यंत पोहचायचे असेल तर अवघी १४० शब्द आपल्याला भेटतात .
आणि तीच १४० शब्द कमाल करतात .
 ट्विटर चा  वापर आजच्या घडीला काही कोट्यवधी लोक करत असतील , करत आहेत .  पण ट्विटर चा जन्म हा काही सरळ झालेला नाही . त्याची कहाणी ही खूप रंजक आहे . ती एखाद्या सिनेमा सारखी वाटते . कारण जे कुणी याचे संस्थापक होते त्यांची च हक्कालपट्टी या कंपनीतुन पुढे जाऊन करण्यात आली होती .
ट्विटर ची मूळ संकल्पना ही नोआ ग्लास व जॅक डॉसी च्या डोक्यात साकारली .
आणि मग नोआ ने इव्हान उर्फ इव्ह ला यात गुंतवणूक करण्यासाठी आग्रह केला .
इव्ह ने अगोदर ब्लॉगर ची निर्मिती केली होती आणि तो ट्विटर ला आकार देऊ शकतो हे नोआ जाणून होता .
पुढे जाऊन इव्ह ने गुगल ला ब्लॉगर विकले व त्याच्या सोबत नोआ व इतर सहकारी गुगल मध्ये नोकरी करू लागले . पण ही नोकरी त्यांना काही रुचली नाही .
पुढे आपली वेगळी वेबसाईट असावी म्हणून  म्हणून हे गुगल मधून बाहेर पडले . नोआ च्या डोक्यात हे काहीतरी करायचे खूळ होते .
आणि तो सतत काहीतरी करत ही राहायचा .


ट्विटर हे नाव कसे पडले याची ही एक रंजक गोष्ट आहे , जेव्हा त्यांनी वेबसाईट तयार केली तेव्हा जॅक ने ‘ स्टेट्स ’ असे नाव सुचवले .
मग बिझ ने ‘ smssy ’ हे नाव सुचवले . इव्ह च्या डोक्यातही एक नाव होते , आणि ते म्हणजे ‘ friend stalker ’ पण ‘ stalker ’ या नावाचा अर्थ इच्छा नसताना मागे लागून त्रास देणारा . म्हणून हे नाव ही त्यांनी नाकारले .
पण या नावासाठी व एकूण च या नव्या गोष्टी विषयी  नोआ फार झपाटलेला होता .  त्याने शब्दकोष घेऊन नाव शोधायला सुरुवात केली आणि तो एका नावा जवळ येऊन थांबला . आणि ते नाव म्हणजेच आजचे ट्विटर .
ट्विट चा अर्थ ‘ काही ठराविक प्रकारच्या पक्ष्यांच्या मंजुळ आवाज . ’ त्याने हे नाव आपल्या इतर सहकार्यांना लगेच कळवले . इतर तिघांना ही हे नाव आवडले . त्यानंतर या वेबसाईटला एक बोधचिन्ह हवे होते ते ‘ बिझ ’ ने बनवले .
पुढे ट्विटरचे उदघाटन कसे झाले , कुना-कुणाची कशी हकालपट्टी झाली हे सगळं या पुस्तकांमध्ये वाचणे रंजक आहे . याहू ला जेव्हा ट्विटर विकायचे ठरते तेव्हा अपेक्षित किंमत न मिळाल्याने त्यांनी विकण्याचा बेत रद्द केला .
फेसबुक च्या मार्क झुकरबर्ग ची ही ट्विटर विकत घेण्याची इच्छा आहे .
आज जगावर ट्विटर ने मोहिनी घातली आहे . त्याचा विस्तार ही खूप मोठा झाला आहे तरीही फार कमी कर्मचारी या मध्ये नोकरी करतात .
ट्विटर जेव्हा अमेरिकेत शेअर मार्केट मध्ये आले तेव्हा पहिल्याच दिवशी ट्विटर ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला .
या पुस्तकात एकमेकांवर कशा कुरघोडी करण्यात आल्या , एकमेकांना बाहेर काढण्यासाठी काय – काय केले हे आणि ट्विटर यशस्वी कसे झाले हे सर्व काही यात वाचायला मिळेल .
आज कुणी जर ट्विट केले तर किती गदारोळ उडतो किंवा ट्विट च्या माध्यमातून कुणी मदतीची याचना केली तर त्याला  कसा प्रतिसाद मिळतो हे आपण बघतो आहोतच .


  ट्विटर सुरू होण्यापूर्वी पहिला संस्थापक इव्हान विल्यम्स , दुसरा संस्थापक नोआ ग्लास , तिसरा संस्थापक जॅक डॉर्सी व चौथा संस्थापक  बिझ स्टोन यांनी देखील याची कल्पना केली असेल का ?
जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे ,ज्यांनी जग बदललं  व आधुनिक संदेशवहनाची जननी ठरलेल्या ट्विटर ची ही धक्कादायक गोष्ट आहे .

Comments

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?