लॉकडाउन च्या काळात पुस्तकप्रेमी पुस्तक वाचनाकडे मोठ्या वळली ?
हा काळ तसा तापदायक आणि घरात बसून राहायचा होता . सगळीकडे एक चर्चा सुरू होती आणि ती म्हणजे सगळे घरात बसा .
सुरुवातीला वाटले लॉकडाउन हे लवकर उठेल पण नंतर ते वाढत गेले . आणि मग या काळात काय करायचे . म्हणून अनेक जण आपल्या जुन्या छंदा कडे वळले . तर काहींनी आपला छंद या काळात आणखी चांगल्या रीतीने जोपासला .
या अनेक छंदापैकी पुस्तक वाचन हा एक अनेक जणांचा छंद होता .
मग अनेक जणांनी आपल्या घरात असणारी पुस्तकं बाहेर काढली . त्यांना ऊन दिलं . आणि पुन्हा पुस्तकं वाचायला सुरुवात केली काहींसाठी पुस्तकं वाचन करने हा प्रकार नवीन होता .मग त्यांनीही पुस्तक हातात घेतले .
हे सगळं होत असताना अनेक जण पुस्तकाबद्दल चर्चा करू लागले , काहींनी फेसबुक किंवा इतर काही अँप्स वर पुस्तकातील कोणत्या गोष्टी आवडल्या त्याबद्दल ही पोस्ट करायला सुरुवात केले .
आणि बघता – बघता पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वाढत गेली . ती इतकी वाढली की प्रत्येक दिवशी एक पुस्तक वाचणारे ही वाचक फेसबुक ला दिसू लागले . फेसबुक ला पुस्तकांचे अनेक ग्रुप आहेत . पण गेल्या दीड महिन्यात आपण या ग्रुप चे निरीक्षण केले तर असे लक्षात येते की अनेकांनी पुस्तकं वाचून पुस्तकांबद्दल पोस्ट लिहलेल्या दिसतायत .
गेल्या दीड महिन्यात फेसबुक ग्रुप वर पुस्तकांबद्दलच्या पोस्ट च प्रमाण हे इतर वेळेच्या पेक्षा प्रचंड पटीत वाढलेले दिसून येत आहे .
काही ग्रुप ची सेटिंग ही ‘ ओन्ली ऍडमिन ’ असल्यामुळे त्यांना प्रत्येक पोस्ट वाचून ती अप्रुव्हड करने किती जिकरीचे ठरत असेल याचा अंदाज आपण घेऊ शकतो .
पुस्तकांबद्दल लिहलं जात आहे त्याबद्दल वाचलं ही जात आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे .
फेसबुक च्या माध्यमातून ग्रुप तयार होऊन अनेकांना पुस्तकं वाचनाची प्रेरणा मिळत असते , आणि अशा काळात हाथी वेळ असल्याने पुस्तकं वाचून होत आहेत .
करोना च्या काळात वाचकांची भूक वाढली , त्यात अनेक पुस्तकांच्या , अनेक म्हणण्यापेक्षा सर्वच दुकाना बंद असल्यामुळे कुणालाही पुस्तकं विकत घेता आली नाहीत .
पण त्यावर पुस्तकंप्रेमींनी आपल्या मित्रांकडून पुस्तकं घेऊन मात केली . पुस्तकांची देवाण-घेवाण ही झाली . आणि तेही लॉकडाउन चे पालन करून .
ज्यांना पुस्तकं मिळाली नाही ,त्यांनी ऑडिओ बुक ऐकली . या काळात ऑनलाईन पुस्तकं उपलब्ध असणाऱ्या वेबसाईटला वाचकांनी मोठ्या प्रमाणात भेटी दिल्या .
त्या भेटींचे प्रमाण हे चार किंवा पाच पटीने वाढलेले दिसून आले .
पुस्तकं वाचनासाठी आणखी एका गोष्टीचा वापर वाढला आणि ती गोष्ट म्हणजे , अमेझॉन किंडल.
लॉकडाउन च्या काळात किंडल चा वापर हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून आला .
अनेकांनी किंडल वर पुस्तकं वाचली .
बरेच जण वेळ मिळत नाही म्हणून पुस्तक वाचन करू शकत नव्हती . काही जण वाचायची पण त्याचं वाचन हे अत्यल्प होते .
आणि काही जण असे होते की त्यांनी कधी ही पुस्तक हाथी घेतले नव्हते .( शालेय पुस्तकं सोडून ) ते सुद्धा या काळात पुस्तक वाचनाकडे वळली . या कोरोनाच्या भयंकर काळात लोक पुस्तक वाचनाकडे वळले हे ही नसे थोडके . नाही का ?
( टीप - तुम्ही या काळात किती पुस्तकं वाचली ते ‘ कॉमेंट ’ मध्ये जरूर कळवा . )
#bookksintro .

23....
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteThanks
Delete