वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र
वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र ,
या पुस्तकाचे लेखक अतुल कहाते हे आहेत , त्यांनी हे पुस्तक मराठी भाषेत लिहले असून बफे बद्दल अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली आहे .
या पुस्तकामध्ये एकूण ५० प्रकरणे असून तीच ५० मंत्र आहेत .
शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची व त्यासाठी कशा प्रकारचा संयम ठेवायला हवा , याची माहिती यात प्रामुख्याने देण्यात आली आहे .
वॉरन बफे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो , पण दीर्घ काळ म्हणजे किती काळासाठी ?
या प्रश्नाला उत्तर बफे असा देतो की कायमसाठी .
पहिला नियम – कधीच नुकसान होऊ देऊ नका .
दुसरा नियम – पहिला नियम कधीच विसरू नका .
हा नियम वर वर सोपा वाटत असला तरी त्याची अंमलबजावणी करणे अवघड आहे . माणसे अनेक गोष्टींवर वायफळ खर्च करत राहतात . अब्जावधी रुपये असताना ही बफे आपल्या अत्यंत सध्या घरात राहतो .
आपली पहिली गुंतवणूक त्याने वयाच्या ११ व्या वर्षी केली , तरी तो म्हणतो .
मी उशिरा च शेअर बाजारात आलो .माझे काही वर्षे वाया गेली .
शेअरबाजारात जर गुंतवणूकदार घाबरलेले असतील तर तुम्ही हावरट व्हा . इतरजण हावरट असताना तुम्ही घाबरून जा ..म्हणजे जेव्हा मार्केट वर जात असते तेव्हा तुम्ही शेअर खरेदी करु नका .
पण जेव्हा शेअर बाजार खाली येत असतो तेव्हा तुम्ही शेअर्स विकत घ्या .
गुंतवणूकी मध्ये जर यश मिळवायचे असेल तर तुम्ही वेगळं किंवा भन्नाट करण्याची गरज नसते . मात्र अभ्यास करणे प्रचंड गरजचे असते असं ही तो सांगतो .
शेअर बाजारात सबुरी ही फार महत्त्वाची आहे , या वर तो जोर देतो .बफे एका ठिकाणी म्हणतो की मी शेअर बाजारात कधीच कमाई करण्याचा प्रयत्न करत नाही . उलट असे समजतो की उद्या शेअर बाजार बंद होईल आणि पुढची दहा वर्षे तो उघडणार नाही .
अर्थात या मागे त्याचा प्रचंड अभ्यास आहे .
मूलतः जर एखादी कंपनी खराब असेल ,पण कंपनीचं व्यवस्थापन जर उत्कृष्ट दर्जाच्या लोकांकडे आलं तरी शेवटी त्या कंपनी चा लौकिक टिकून राहतो .
जसजशी कंपनीची कामगिरी सुधारते , तसे तसे त्या कंपनीचे शेअर वर जातात .
बफे म्हणतो की तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे , आपण आपलं आयुष्य कसं जगायचं हे इतर लोकांना का ठरवू द्यायचं ?
आपल्याला कळत नसलेल्या व्यवसायामध्ये कधीच गुंतवणूक करू नका .
गुंतवणूक करताना जास्त कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करता मोजक्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा .
आणि त्या विषयी अगोदर अभ्यास करा .
बफे चा पुढील मंत्र महत्वाचा आहे , माझ्या आयुष्याच मूल्यमापन मी किती कमाई केली या गोष्टींवरून करत नाही .
कदाचित इतर लोक असं करत असले तरी मला त्याच्याशी देणं घेणं नाही .
वॉरन बफे ची राहणीमान ही अत्यंत साधी आहे , आज ही या वयात तो दिवसाच्या काही तास वाचन करतो .
वाचन हे शेअर बाजारात महत्वाचे आहेच . पण आपल्या जीवनात ही त्याचे महत्व आहे .
आपल्याला हे यश वाचनामुळेच मिळाल्याचे ही तो सांगतो .

मला हे पुस्तक कुठे मिळेल
ReplyDeleteसर / मॅडम ,
ReplyDeleteहे पुस्तक बुक गंगा वर उपलब्ध आहे .
सध्या कोरोनो मुळे मिळणे कठीण आहे .
पण जेव्हा मिळेल तेव्हा जरूर वाचा .
धन्यवाद .
अशाच चांगल्या पुस्तकासाठी ब्लॉग ला फॉलो करा .
धन्यवाद