एकदा गेलेली पुस्तकं परत येत नाहीत ...
.....एकदा गेलेली पुस्तकं परत येत नाहीत …
पुस्तकं वाचायची ज्यांना सवय असते , आणि जे ‘ बुक लव्हर म्हणून ओळखले जातात . त्यांना एक अनुभव नेहमीच येतो किंवा किमान एकदा तरी तो अनुभव त्यांना आलेला असतो , तो कोणता अनुभव हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ?
तो प्रश्न म्हणजे तुम्ही दिलेली पुस्तकं परत येत नाहीत किंवा ती फार मागावी लागतात किंवा कधी कधी तुम्ही विसरून जाता , आणि ते का विसरता तर तुम्ही ज्यांने कुणी तुमच्याकडून पुस्तकं नेली असतील त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी ती पुस्तकं नेलेली असतात आणि पुन्हा ती येतच नाहीत . आणि मग दिलेल्या पुस्तकाचा तुम्हाला विसर पडतो .
आजच्या लेखाचा हाच विषय आहे , तुम्ही दिलेले पुस्तक तुम्हाला मागे परत मिळाले का ? किंवा तुम्हाला ते पुस्तक मागे घेण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले .
बरोबर दोन वर्षांपूर्वी एका खूप जवळच्या मित्राला मी काही पुस्तकं दिली .
खरंतर त्याने ती माझ्याकडून घेतली . त्याला पुस्तकं वाचायची अचानक खुम-खुमी आली होती .
आणि मग त्याने पुस्तकं वाचायची त्याने नियोजन करायचे ठरवले , नियोजन झाले , पुस्तक वाचायचे ठरले . पण त्याची आता अशी अडचण होती की त्याच्या जवळ पुस्तकच नव्हते , मग काय करायचं म्हणून तो माझ्याकडे आला व त्याने मला काही पुस्तकं मागितली . मी ही ती दिली .
आता यात दोन वर्षे निघून गेली , आणि मला ही पुस्तकांचा विसर पडला .
मी कोणते पुस्तकं दिले हे ही मला आठवत नव्हते .
एक दिवस मला तो भेटला ,त्यानेच पुस्तकांचा माझ्याकडे विषय काढला . मला तो पुस्तक आणून देतो म्हणाला . एकूण सहा पुस्तकं त्याच्याकडे होते .
आता यातही आणखी दोन महिने गेले , आता मी वैतागलो होतो . फोनवर मेसेज करून ही पुस्तकं काही मिळत नव्हती . कुठे भेटला तर देतो . हे त्याचे वाक्य ठरलेले असायचे . यात आणखी चार महिने गेले , म्हणजे आता पुस्तकं नेलेली अडीच वर्षे झाली होती . पुस्तकं काही येत नव्हती . त्याला दिलेली पुस्तकं ही माझी आवडती होती . आणि थोडी महागडी होती .
आता तर मी मेसेज करणे ही बंद करून टाकले होते . पुस्तकं मागे मिळणार नाहीत . हा विचार मनात येऊन पुस्तकं मागे येण्याची ही अपेक्षा मी सोडून दिली .
हा अनुभव तुम्हाला ही अनेकदा आला असेल , अनेक जण पुस्तकं वाचण्याची खुमखुमी आली की पुस्तकं घेऊन जातात . आणि मग पुन्हा ती कधीही मिळत नाहीत .
यात आणखी एक गोष्ट असते जे खरे वाचणारे असतात , ज्यांना दररोज पुस्तक वाचल्याशिवाय झोप येत नाही ते मात्र पुस्तकं आणून देतात . आणि त्या पुस्तकांना जीवापाड जपतात . पुस्तकाचे पान सुद्धा कुठे ही दुमडलेले नसते . पानावर कुठे ही पेन ने रेघा ही ओढलेल्या नसतात . इतके ते त्याला जपतात .
ही खरी पुस्तकप्रेमी असतात .
जिथे पुस्तकं परत येत नाहीत ती कधीही पुस्तकप्रेमी असू शकत नाही . आपलीच पुस्तकं वारंवार मागावी लागणे ही गोष्ट फार अडचणीची व फार कटकटीची असते .
बरोबर एक महिन्याने परत मेसेज आला , आज पुस्तकं देतो म्हणून , मी आशा सोडलीच होती . संध्याकाळी तो आला आणि सहापैकी चार पुस्तकं देऊन गेला . अजून दोन पुस्तकं त्याची वाचायची राहिली होती . एकेकाळी दिवसाला एक पुस्तकं वाचून काढतो म्हणून माझ्याकडून सहा पुस्तकं घेऊन जाणारा आज पावणे तीन वर्षानंतर सुद्धा अजून दोन पुस्तकं वाचायची राहिली म्हणतो . आणि ती लवकरच आणून देतो . असे म्हणून निघून जातो .
या ही गोष्टीला आता एक वर्ष होत आले आहे , दोन पुस्तकं अजून पर्यंत आलीच नाहीत . कदाचित ती आता येणार नाहीत .
ती त्याच्याकडे नसतील तर ती पुन्हा येण्याची ही शक्यताही कमी वाटते . आणि जर ती पुस्तकं परत आलीच तर तो माझ्यासाठी ‘ सुदिन ’ असेल .
हाव राव मला पण हीच अडचण आहे त्यामुळे सध्या तरी मी कोणाला पुस्तक देण्याची थांबवली आहेत.
ReplyDeleteपुस्तकं परत मिळणे फार कठीण होऊन बसते मग .
Deleteहा अनुभव नित्याचा
ReplyDeleteYes
ReplyDelete