रिच मदर रिच सन - भाग -२

रिच मदर रिच सन
 रिच मदर रिच सन -

आपण गेल्या आठवड्यात या पुस्तकाचा पहिला भाग वाचला असेल , हा भाग आपल्याला कसा वाटला ते जरूर सांगा .

आता आपण दुसऱ्या भागात लोक नोकरी का करतात ? खरंतर नोकरी करणे म्हणजे गरीब होणे असा होतो .

विचार करा की शिवाजी महाराजांनी जर नोकरी म्हणजे कुणाकडे चाकरी केली असती तर आज ते स्वराज्य उभा करू शकले असते का ? अर्थातच  नाही . आणि म्हणून ज्याला काही तरी करून दाखवायचे असेल किंवा श्रीमंत व्हायचे असेल तर त्याने नोकरीचा मार्ग पत्करू नये .

नोकरी करणे म्हणजे गर्दीच्या मागे जाणे , एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की  कठीण बाबच तुम्हाला श्रीमंत करेल .


श्रीमंत होण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आपल्या जन्म स्थळापासून पुढे सरका .

म्हणजे गाव सोडल्या शिवाय प्रगती नाही . कुणी जर असा विचार करत असेल की आपण आपल्या गावातच आयुष्यभर राहू तर तुम्ही तुमच्या प्रगतीत खोडा घालत आहात .
श्रीमंत होण्यापासून तुम्ही स्वतःला रोखत आहात .

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुध्दा जन्म स्थळ सोडले .

आर्थिक बाबी सोडवताना पहिल्यांदा इन्व्हेस्ट कर म्हणजे किल्ले बांध . आले पैसे की किल्ले बांध हा ही सल्ला जिजाऊ आपल्या मुलाला देतात . हाच सल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम लक्षात ठेवला व तीनशे हुन अधिक किल्ले बांधले .

इन्व्हेस्ट करताना जीवनात आवश्यक नसणाऱ्या गोष्टी जवळ बाळगू नका . पांढरा हत्ती कधी ही पोसू नका . आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कधीही लढण्यासाठी हत्ती नव्हते .

वायफळ गोष्टीवर कधीही खर्च करू नका . हत्ती न बाळगणारे जगात एकमेव राज्य किंवा स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांचे होते .

श्रीमंत होण्यासाठी कायम जोखीम उचलावी लागते , ज्याच्याकडे जोखीम उचलण्याची क्षमता असते पैसा कायम त्याच्याकडे येतो .

श्रीमंत लोक कधी ही गर्दीचा भाग होत नाहीत ,
त्याच बरोबर कौतुक आणि कृतज्ञता  हे दोन गुण सदैव जोपासतात .

हे दोन गुण छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम जोपासले  .

प्रत्येक आईने हे पुस्तक जरूर वाचावे .
ज्या आईला आपला मुलगा कर्तृत्ववान व्हावा असे वाटते त्या आईने हे पुस्तक जरूर वाचावे .


समाप्त.

Comments

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?