पुस्तकप्रेमी
#पुस्तकप्रेमी
गेल्या आठवड्यात या दोन इमेजेस इंटरनेट वर सापडल्या , त्यातले पहिले कार्टून आहे ते एक मुलगी फोन हातात घेऊन आपला सेल्फी पुस्तकांबरोबर काढत आहे , तर दुसरी इमेज आहे ती आपण पुस्तक वाचताना पानाला घडी मारतो किंवा ते दुमडतो .
आणि त्यासोबत आपण जेवढं वाचलं त्या दोन पानाच्या मध्ये कागदी बुक मार्क ठेवतो .
पुस्तकं ही आपली मित्र असली पाहिजेत , पुस्तकं ही कधीही आपल्याला चुकीचा मार्ग दाखवत नाहीत . ते कधीही चुकीच्या दिशेने घेऊन जात नाहीत .
अनेक जण अशी आहेत की ते पुस्तकांवर जीवापाड प्रेम करतात . पुस्तकं ही त्यांची मित्र असतातच पण ती त्यांची मार्गदर्शक , गुरू ही असतात .
जगभरात अशी अनेक लोक आहेत जी की मान्य करतात की आमचं आयुष्य हे पुस्तकांमुळे बदलेले आहे .
मोठ मोठ्या कंपनीचे मालक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी हे सतत वाचत असतात . आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो की यांच्या कडे एवढा वेळ उपलब्ध आहे का ? त्यांना तितका वेळ मिळतो का ? आपल्या एवढ्या बिजी शेड्युल मध्ये ते कसा काय वेळ काढू शकतात .
तुम्ही बिल गेट्स यांचे नाव ऐकले आहे का ? म्हणजे ऐकलेच असेल . मायक्रोसॉफ्ट चे मालक यांना मागे पुस्तकांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी असे सांगितले की मी सन २०१९ मध्ये एकूण ५० पुस्तकं वाचली .
हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल . आणि का नाही बसणार ?
ही गोष्ट आहेच मुळी धक्का बसण्यासारखी , इतका मोठ्या माणसाला आणि कोट्यवधी रुपयांची कमाई करणारा हा माणूस . ज्याची एक नोट खाली पडली तर ती नोट उचलण्यास जेवढा वेळ त्याचा जातो तेवढ्या वेळेत तया नोटेच्या कितीतरी पट तो पैसे कमवत असतो . आणि त्याच्याकडे ती नोट उचलायला ही वेळ नाही .मग बिल गेट्स कसे काय एवढे पुस्तकं वाचू शकतात .?
तर याचे उत्तर होय असे आहे , महिन्याला किमान पाच पुस्तकं वाचून काढायचा असा त्यांचा शिरस्ता आहे .
आपल्या वैयक्तिक जीवनात पुस्तकामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे हे ही ते मान्य करतात .
आणि म्हणूनच ते पुस्तकांना आपला ‘ बेस्ट फ्रेंड ’ मानतात .
दुसरी इमेज आहे ती पुस्तकाचे पान आपण दुमडतो की बुक मार्क चा वापर करतो .
काहींना बुकमार्क पुस्तकासोबत ठेवण्याची खूप आवड असते . आणि ते याचा वापर कटाक्षाने करतात ही .
त्यांना आपल्या पुस्तकातील पानांना घडी मारलेली अजिबात आवडत नाही .
आणि दुसरा प्रकार हा आहे की जेवढे पुस्तक वाचून झाले आहे त्या पानाला घडी मारून ठेवायची .
ही पद्धत अनेक जण वापरतात . अनेकांना ही सवय आहे .
पण या सवयी मुळे पुस्तकाची पाने मात्र खराब होतात .
म्हणून बुकमार्कचाच वापर करावा .
दोन ही ‘ इमेजेस ’ कशा वाटल्या त्या सांगा .
आणि हो पुस्तक वाचायचे काही सोडू नका .
#keepReading

सर/मॅडम तुमच्या ब्लॉग वरील सर्व लेख वाचले.खूप चांगल्या प्रकारे व सध्या आणि सोप्या भाषेत...वाचून मजा आली😊
ReplyDeleteThanks
ReplyDelete