सफलतेचे मंत्र

।।सफलतेचे मंत्र –।।


लेखक – डॉ. सुधीर दीक्षित

या पुस्तकात जगभरातील एकूण २० प्रतिष्ठित ब्रँडसच्या सफलतेची कहाणी सांगण्यात आली आहे .
सर्वाना उपयुक्त ठरेल अशी माहिती या पुस्तकात देण्यात आली असून डॉ. सुधीर दीक्षित यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपले लेखन केले आहे .
लोकांना सहज प्रेरणा मिळावी म्हणून लेखकाने हे पुस्तक लिहले आहे .
वीस महान उदयोगपती व त्यांनी आपला व्यवसाय कसा वाढवला याची माहिती किंवा मंत्र यात सांगण्यात आलेले आहेत .

या पुस्तकातील गोष्टींमुळे आपल्याला मार्गदर्शन होऊ शकते , त्यांना जमले मला का जमू शकत नाही .
हा आत्मविश्वास तुम्हाला येऊ शकतो .
ऑस्कर वाइल्ड यांनी जे सांगितले आहे ते कायम लक्षात ठेवा  .
“ यश मिळवण्यासाठी एक शास्त्र आहे . तुम्ही जर परिस्थिती निर्माण केलीत तर त्याचे फळ मिळणारच .”

या पुस्तकात अमेझॉन डॉट कॉम , अँपल , आर्सेलॉर् मित्तल , बर्कशायर हॅथवे , कोका- कोला , डेल इंक , वॉल्ट डिस्ने , फेसबुक , गूगल , इन्फोसिस , मॅकडोनाल्ड , मर्सिडीज-बेंझ , मायक्रो सॉफ्ट , नाइके ,रिलायंस , टाटा ग्रुप , टोयोटो , ट्विटर , वर्जिन ग्रुप , वॉलमार्ट
या वीस ग्रुप ची माहिती देण्यात आली आहे .
या वीस उद्योग समुहाचा विचार एकत्रित पणे केला तर काही साम्य यांच्या मध्ये आढळतात .
त्यांनी आपले उद्योग सुरु केले , तेव्हा सगळ्यांनी त्यांना वेड्यात काढले . पण ते आपले काम करत राहिले .
दुसरं साम्य आढळते , हे लोक आपल्या उद्योगाबद्दल प्रचंड पॅशीनेट होती . मेहनती शिवाय आपल्याला फळ मिळणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती .
 त्यांना आपल्या कंपनी चा ठसा संपूर्ण जगात उमटायचा होता .
आणि म्हणून अमेझॉन चा मालक जेफ बेजोस म्हणतो ,
‘ जगामधील सर्वात अधिक ग्राहक -केंद्रित कंपनी म्हणून ओळख निर्माण करणं हे आमचे ध्येय आहे .
प्रत्येक गोष्टीत यांनी नावीन्य आणलं , स्टीव्ह जॉब्स ची अँपल कंपनी बघा .
नावीन्याच्या आधाराने आम्ही पैसे कमावतो . असं स्टीव्ह जॉब्स त्या मुळेच म्हणतो .

मी तयार केलेली कोका – कोलाची बाटली जगभरातील प्रत्येक माणसापर्यंत मला पोहचायची आहे .
कोका-कोला  शीतपेयाची चव सर्व लोकांनी चाखली पाहिजे .
हे रॉबर्ट वूड्रफ च स्वप्नं होत .
मी कधीही अपेक्षा केली नाही , मी कुणाकडे परवानगी मागितली नाही , दुजोरा मिळेल अशी अपेक्षा नव्हती .
मी तर फक्त पुढे जात राहिलो नि माझ्या मनासारखे करीत राहिलो .
असं मायकल डेल म्हणतो .
हा तोच डेल ज्याने डेल लॅपटॉप बाजारात आणून धुमाकूळ घातला ..
फेसबुक आणि गुगल ने आपलं साम्राज्य कसं वाढवलं ते ही या पुस्तकात वाचायला मिळत .
सण १९८४ ला जन्मलेल्या मार्क झुकेरबर्ग शिक्षण अर्धवट सोडलेले असताना ही इतिहास रचला .
गुगल व फेसबुक चे दोघेही ध्येयाने पछाडलेले होते .
आपले स्वप्नं साकार होई पर्यंत ते थांबले नाहीत .
‘ नवा पायंडा पाडण्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे मानवी मेंदूचे सामर्थ्य .’
हे वाक्य नारायण मूर्ती यांचे आहे .
त्यांनी आपकी इन्फोसिस कशी उभा केली याबद्दल यात माहिती आहे .
मर्सिडीज ची ही कहाणी अशीच , ‘ एकतर सर्वश्रेष्ठ …नाहीतर काहीच नाही .’


बिल गेट्स ने तर कमाल च केली आहे , अर्धवट शिक्षण त्यात अनेक विषयात बिल गेट्स नापास तरी तो जगातल्या पहिल्या पाच जणांच्या  श्रीमंताच्या यादीत कायम राहिला आहे .
त्याच वेड , भव्य स्वप्न पाहणं , संधीचा लाभ घेणं , या गोष्टीमुळे तो इथं पर्यंत पोहचला .

तो एका ठिकाणी म्हणतो , ‘ मी परिक्षेमध्ये काही विषयात नापास झालो होतो , पण माझा मित्र सर्व विषयांत पास झाला होता .
तो आज मायक्रोसॉफ्ट मध्ये अभियंता आहे आणि मी त्या मायक्रोसॉफ्ट चा मालक .’
अपयशाने खचून न जाणाऱ्या बिल ची कहाणी वाचण्यासारखी आहे .
हे पुस्तक वाचताना तुमच्या लक्षात येईल , यातली बरेच जण शाळा कमी शिकलेले , नापास व हे काही ही करू शकणार नाहीत . अशी टोमणे ऐकणारी होती .
पण त्यांनीच पुढे जाऊन असं काही करून दाखवलं की जगाला त्यांची नोंद घ्यावी लागली .
त्यांच्या शिवाय आता तर आपला दिवस जात नाही , असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही .
आठवा गुगल , व्हाट्सअप्प आणि फेसबुक .

त्यांच्यातील आणखी एक साम्य म्हणजे , ही सर्वजण वेडी म्हणून संबोधली गेली होती , पण वेडेच इतिहास घडवतात . नाही का ?

पुस्तकात त्यांनी कसे यश मिळवले , त्यांचा संघर्ष , बाळकडू , त्यांची मेहनत , अचूक पाऊल , महत्वपूर्ण वळण याची माहिती देण्यात  आली आहे .

प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे .
आपण नाही उद्योगपती झालो तरी हे पुस्तक तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात यश कसे मिळवायचे हे मात्र शिकून जाते .

जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे , विशेषतः कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी व व्यवसाय करणाऱ्यानी .

जरूर वाचा , सफलतेचे मंत्र .

Comments

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?