जुने ते सोने..

90 च्या दशकातील गाण्यांनी माझ्या पिढीला प्रचंड भुरळ घातलेली आहे .आज ही गाणी कानावर पडली की मन एका क्षणात त्या काळात जाते.
तो काळ आठवायला लागतो , मग त्या काळातील गंमती जमंती सगळचं आठवते .काल प्रवासात या दशकातील काही गाणी कानावर पडली .रात्री घरी आल्यावर you tube ओपन करून मनमुराद पन्नास च्या आसपास गाणी ऐकली .मन अक्षरशः भरून आले.
त्या काळी माझ्या पिढीला कुठुन तरी गाणी ऐकायला यायची.मिळायची .ट्रॅक्टर ला गाणी लाऊन कुणी तरी ट्रॅक्टर पळवायचा .
 सत्यनारायण झाले की लोक  गाणी लावायची .
गणपती मंडळे दिवसभर गाणे वाजवायची .
कमांडर जीप  मध्ये तर ही गाणी मस्ट होती .
टेम्पो ड्रायव्हर टेम्पो मध्ये गाणे वाजवायचे .
छायागीत , रंगोली,चित्रहार आठवड्यातून एकदा एकदा टीव्हीला यायचे.यू ट्यूब नसल्याने यावर अवलंबून रहावे लागायचे.पण त्यात वेगळीच मजा होती.
याच दशकात घरोघरी टीव्ही दिसायला लागला.पुढे टेपरेकॉर्डर आला.कॅसेट आणून गाणी ऐकायची मजाच वेगळी होती .कॅसेट भरून आणल्या जायच्या .त्या ऐकल्या जायच्या.एकमेकांना दिल्या जायच्या.
आज सगळे सोर्स उपलब्ध असताना एका क्लिक वर कुठलेही गाणे कुठे ही बसून ऐकता येते .तरी ती मजा येत नाही.
आज ही गाणी कानावर पडली की मी थेट गावाकड्याच्या वातावरणात जातो. ते दिवस आठवतात.तिथले बालपण .मग शाळा .पुढे कॉलेज  . मग मन भरून येते .ते दिवस परत येणार नाहीत याची जाणीव होते.
काही नसताना आयुष्य चांगले जगलो वाटत राहते.आज सगळं काही एका क्लिक वर असताना .आणि त्या दिवसापेक्षा आजचे दिवस चांगले असताना .त्या दिवसाची सर काही केल्या येत नाही.
कितीतरी आठवणी या पिढीच्या आहेत. शुक्रवारचा सिनेमा .रविवारचा मराठी चित्रपट.सोबत चंद्रकांता, अली बाबा चाळीस चोर , सुरभी ,  कॅप्टन व्योम, मोगली , शक्तिमान. किती किती आठवणी .
ते दिवस भारी होते याची आठवण येत राहते.टाइम मशीन मला कुणी आणून दिले तर मी 30 /35 वर्ष मागे जाईल.
मला पुढे जाणे आवडणार नाही...मला नकोच पुढचा काळ.

( कमेंट मध्ये आवडणाऱ्या एका गाण्याची लिंक दिली आहे.
गाणे 1964 मधील आहे .आवडेल तुम्हाला.कालपासून या गाण्याने मला बेजार करून सोडले आहे.नुसतं नॉस्टॅल्जिया. आवडेल तुम्हाला...)

Comments

या पोस्ट सर्वाधिक वाचल्या गेल्या .👍

एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?

ई - पुस्तकांचे भविष्य ...येणाऱ्या काळात वाढणार आहे .

वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

झिरो टू वन - पीटर थिल

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

वाचाल तर वाचाल.

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?