चला या नव्या वर्षात १०० पुस्तकं वाचूया ...
पण त्यासाठी वेळ नसतो .
माझ्याकडे वेळ नाही म्हणून अनेक जण पुस्तक हातात घ्यायचे टाळतात .
हे हातात घेणे टाळणे म्हणजे पुस्तक वाचनापासून दूर जाणे , अगोदर हातात पुस्तक घेणे गरजेचे आहे .
या पृथ्वीवर सर्वांना समान म्हणजे 24 तासच उपलब्ध आहेत , कुणाला जास्त किंवा कमी वेळ मिळत नाही , बिल गेट्स जेव्हा वर्षाला 50 च्या वर पुस्तक वाचतात तेव्हा त्यांना ही 24 तास उपलब्ध असतात .
आणि आपल्याला ही 24 तास उपलब्ध असतात .
आपल्या पेक्षा त्यांना निश्चित जास्त काम आहे , ते निश्चितच आपल्यापेक्षा बिजी आहेत .
मग हे त्यांना कसे जमते ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे .
वेळ काढून पुस्तकं वाचावी लागतात , मग त्यासाठी लवकर उठणे , सकाळीच थोडे पुस्तक वाचून कामाला बाहेर जाणे , दुपारच्या वेळी थोडा वेळ असेल तर त्यावेळेस हातात पुस्तक घेऊन वाचायला बसने .
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल ची स्क्रिन डोळ्यापुढे धरण्यापेक्षा पुस्तकाची पाने डोळ्यापुढे घेऊन बसने गरजेचे आहे .
तुम्ही एवढे ही करू शकलात तर दिवसाकाठी तुम्ही किमान साठ ते सत्तर पाने वाचून काढलेली असतात .
अनेकांच्या तोंडून मी अनेकदा ऐकतो , पुस्तक वाचायचे आहे पण वेळ नाही . वेळ तुमच्याकडे नसणे म्हणजे तुम्ही काही तरी मोठी क्रांती करत आहात .
पण तसेही नसते , तुमच्या हातून काहीही क्रांती घडत नसते , तुम्ही दिवसातले आठ ते दहा तास मोबाईल वर पडीक असता .
हा वेळ तुम्हाला कमी करता आला पाहिजे .
सर्वात वाचनाची उत्तम वेळ कोणती असेल तर ती सकाळी ची वेळ आहे , रॉबिन शर्मा च्या एका पुस्तकात सकाळच्या वाचनाच्या वेळेचे महत्त्व सांगितले आहे , तुम्ही सकाळी व्यायाम करून अगदी वीस मिनिटे जरी पुस्तक वाचले तरी तुमचा दिवस सुंदर जातो .
सकाळची 20 मिनिटे मोबाईल ला देण्यापेक्षा पुस्तकांना दिली तर एका वर्षात 100 पुस्तकं वाचणे अशक्य नाही .
प्रवासात आपल्या सोबत कायम पुस्तक असले पाहिजे , जसा आणि जिथे वेळ मिळेल तिथे आपण पुस्तक वाचले पाहिजे .
दिवसातल्या वेगवेगळ्या वेळेत वीस किंवा तीस पाने तुम्ही वाचली तरी
किमान साठ ते शंभर पाने तुम्ही दिवसाला सहज वाचू शकता , त्यासाठी तास - दोन तासाची बैठक मारून पुस्तक वाचनाची काहीही आवश्यकता नाही .
थोडे थोडे करत दिवसातल्या मोकळ्या वेळेचा उपयोग करून तुम्ही आठवड्याला दोन आणि वर्षाला 100 पुस्तकं सहज तुम्ही वाचू शकता .
संकल्प दर वर्षी येतात आणि अर्धवट स्थितीत तसेच राहून जातात ,
मुळात जेव्हा तुम्ही एखादा संकल्प हाथी घेता , तेव्हा तो रोज थोडा थोडा करून पुढे घेऊन जायचा असतो , पहिल्या दिवशी किंवा पहिल्या महिन्यात मोठा घास घ्यायचा प्रयत्न करायची काहीही गरज नसते .
नवीन वर्षात पुस्तक वाचनासाठी शुभेच्छा .
Sagar Arjun Shinde#fb790
अनेक जणांना पुस्तक वाचायचे असते , महिनाकाठी चांगली आठ - दहा पुस्तकं वाचायची असतात .

#bookksintro

Comments
Post a Comment
धन्यवाद