एका वर्षात १०० पुस्तकं वाचायची आहेत ?
सन - २०१९ मध्ये एका निरीक्षणानुसार भारतीय लोकांनी मोबाईल चा वापर हा सरासरी दिवसाला चार तास केला , सन - २०२० मध्ये मोबाईल चा वापर हा आणखी एक तास वाढणार आहे , म्हणजे तो दिवसाला पाच तास होणार आहे . स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात आपल्या देशात प्रचंड प्रमाणात वाढली आहे . त्यात मोबाईल मध्ये अनेक नवनवे अँप्लिकेशन ही वाढत आहेत . मोबाईल मध्ये जुनेच पण आपला जास्त वेळ खर्च करायला लावणारी अँप्लिकेशन म्हणजे फेसबुक , व्हाट्सअप्प ही दोन अँप्लिकेशन . पण अलीकडच्या काळात टिक टॉक या अँप्लिकेशन मुळे ही अनेकांचा वेळ खर्च होत आहे . सोबतीला यु ट्यूब सारखे अँप्लिकेशन ही आहेच . आणि यांच्या वापरामुळे पुस्तक वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे . त्यामुळे पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे . दिवसभर जर आपण तीनशे मिनिटे म्हणजे पाच तास फोन वर असू तर आपण यातला एक तास कमी करायला हवा . आणि त्या एका तासात आपण वाचन केले तर आठवड्यात किमान सात तासांचे वाचन होऊन जाते . सरासरी साठ पाने आपण दिवसाला वाचले तर आठवड्याला दोनशे पानांचे दोन पुस्तकं ...