Posts

Showing posts from May, 2020

डोंगरी ते दुबई

Image
डोंगरी ते दुबई  मुंबई च्या 60 वर्षातील गुन्हेगारी क्षेत्राचा मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे ,. 50 च्या दशकात मुंबई कशी होती .  मुंबई चा पहिला डॉन कोण ?  तर दाऊद दुबई ला कसा गेला तिथून तो कराची ला कसा पोहचला .  अरुण गवळी , मन्या सुर्वे अशा अनेक डॉन ची कथा या पुस्तकात आहे . पहिल्या ओळी पासून हे पुस्तक तुमचा ताबा घेतं , पुढे काय - पुढे काय याची उत्सुकता लागत राहते . 93 च्या बॉम्ब स्फोटा नंतर दाऊद मुंबई त परत येऊ इच्छीत होता , त्याला कुणी आडवले . छोटा राजन वर हल्ला कसा झाला . छोटा शकील कोण होता . मुंबईत गॅंग वार कसं झालं , ते कुणी घडवून आणलं . दाऊद चा त्यात काय रोल होता . अबू सालेम कसा घडला . कसा डॉन झाला , त्याला पकडून कसे आणले . मन्या सुर्वे सर्वात हुशार आणि वाचक होता . अनेक कादंबऱ्याच वाचन त्याने केलं होतं .  70 च्या दशकात बॉलीवूड मधील सिनेमात गुन्हा घडल्यावर पोलीस उशिरा पोहचू लागली असं चित्रण दाखवू लागले  ते  का याच खरं कारण या पुस्तकात आहे . बॉलीवूड ला दाऊद ने आपल्या इशाऱ्यावर कसं नाचवले . त्यांच्या पार्टीला कोण कोण हजर होते . दाऊद चा प्रेमभंग झाल...

एकदा गेलेली पुस्तकं परत येत नाहीत ...

Image
.....एकदा गेलेली पुस्तकं परत येत नाहीत …  पुस्तकं वाचायची ज्यांना सवय असते , आणि जे ‘ बुक लव्हर म्हणून ओळखले जातात . त्यांना एक अनुभव नेहमीच येतो किंवा किमान एकदा तरी तो अनुभव त्यांना आलेला असतो , तो कोणता अनुभव हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ?  तो प्रश्न म्हणजे तुम्ही दिलेली पुस्तकं परत येत नाहीत किंवा ती फार मागावी लागतात किंवा कधी कधी तुम्ही विसरून जाता , आणि ते का विसरता तर तुम्ही ज्यांने कुणी तुमच्याकडून पुस्तकं नेली असतील त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी ती पुस्तकं नेलेली असतात आणि पुन्हा ती येतच नाहीत . आणि मग दिलेल्या पुस्तकाचा तुम्हाला विसर पडतो .  आजच्या लेखाचा हाच विषय आहे , तुम्ही दिलेले पुस्तक तुम्हाला मागे परत मिळाले का ? किंवा तुम्हाला ते पुस्तक मागे घेण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले .  बरोबर दोन वर्षांपूर्वी एका खूप जवळच्या मित्राला मी काही पुस्तकं दिली .  खरंतर त्याने ती माझ्याकडून घेतली . त्याला पुस्तकं वाचायची अचानक खुम-खुमी आली होती .  आणि मग त्याने पुस्तकं वाचायची त्याने नियोजन करायचे ठरवले , नियोजन झाले , पुस्तक वाचायचे ठरले . पण त्याची आता अश...

लॉकडाउन च्या काळात ऑनलाईन वृत्तपत्र वाचावी लागली आणि ऑनलाईन पुस्तकं ही .

Image
  लॉकडाउन मुळे आयुष्य बदलून गेले आहे . अनेकांना ‘ वर्क फ्रॉम होम ’  करावे लागले , असे काम यापूर्वी कुणीही केले नव्हते .  लॉकडाउन मध्ये पुस्तकांच्या दुकाना बंद होत्या ,आणि त्यामुळे पुस्तकं मिळणे कठीण होऊन बसले आहे . गेल्या दोन महिन्यात पुस्तकं कुणाला ही मिळाली नाहीत .  आणि मग त्याला पर्याय म्हणून काही जण ऑनलाईन पुस्तकाकांडे वळली .  कागदी पुस्तकं आणि ऑनलाईन पुस्तकं यात कोणती चांगली , यासाठी दोन गट पडतील . कागदी पुस्तकं वाचणारा गट नेहमी म्हणतो की आम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात , नवीन पुस्तक हाथी पडल्यावर त्याचा येणारा वास आम्हाला हवाहवासा वाटतो . पुस्तक वाचत असताना कुठपर्यंत वाचून झाले तिथे पान दुमडने हे ही त्यांना आवडते .  अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचं समर्थन कागदी पुस्तकं वाचणारी मंडळी करत असतात . पण गेल्या दोन महिन्यात वृत्तपत्र सुद्धा उपलब्ध झालेले नाही ,आणि असे अनेक जण आहेत की ज्यांना दररोज वृत्तपत्र वाचायला लागायचे  .  किंबहुना रोज दोन किंवा तीन वृत्तपत्र वाचणारे देखील आहेत , पण या लॉकडाउन च्या काळात मात्र या सर्वांनी ऑनलाईन वृत्तपत्र वाचून काढली...

पुस्तकाचे नाव - व्हेन .

Image
... पुस्तकाचे नाव - व्हेन ,  लेखक - डॅनियल पिंक  हे पुस्तक प्रामुख्याने तुमच्याकडे एनर्जी कधी आणि कोणत्या वेळेत असते याचे भाष्य करते . लेखकाने ट्विटर च्या ट्विट मधून एक सर्व्हे केला असून त्यात त्याला असे दिसून आले की सकाळी जे लोक ट्विट करतात , ते सकारात्मक असतात . तर दुपारी जे ट्विट होतात , त्यात नकारात्मकता जास्त आढळून येते . व जेव्हा रात्र होते तेव्हा पुन्हा सकारात्मक ट्विट दिसून येतात . या पुढे जाऊन लेखकाने काही सर्व्हे केले असून त्यात त्याने असे मत नोंदवले आहे की सकाळी माणसे जास्त काम करतात ,  आणि त्यांच्या कडे पॉझिटिव्ह एनर्जी ही सकाळी दिसते ,  दुपारच्या वेळेत लोकांमध्ये चिडचिड अधिक प्रमाणात दिसून येते . .तर पुन्हा रात्री लोक नॉर्मल होतात , आणि जास्त पॉझिटीव्ह काम करतात . ६० ते ८० टक्के लोकांना सकाळी काम करू वाटते , तर उरलेल्या लोकांना रात्री काम करू वाटते . एडिसन ला रात्री काम करायला आवडायचे . ज्यांना रात्री काम करायला आवडेल त्यांनी जरूर करावे पण  रात्री काम करणारे दुसऱ्या दिवशी मात्र चिडचिड करतात . हे आढळून आलेले आहे . सलग काम केले तर कंटाळा येतो म्हणून न...

पुस्तकामुळे माणूस माणूसघाना होतो का ?

Image
. .....पुस्तक वाचन ही प्रक्रिया खूप कंटाळवाणी असते का ? किंवा माणसापासून दूर घेऊन जाणारी असते का ?  हा प्रश्न अनेकदा पुस्तकं वाचन करणाऱ्या पुस्तकं प्रेमींना पडत असतो . आणि तो यासाठी की पुस्तकं वाचत करत असताना वाचणारा इतका गढून जातो की त्याला इतर काही कामं असतात याचा पण विसर पडत जातो . किंबहुना त्याला ती कामं च करू वाटत नाहीत .  तुम्ही हॅरी पॉटर वाचत असाल आणि तेवढ्यात तुम्हाला घरातील व्यक्तीनें काही वस्तू बाहेरून आणायला सांगितली तर तुमची यावर काय ‘ प्रतिक्रिया ’ असेल ?  किंवा तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला तुमच्या मित्रांचे सतत फोन येत  असतील , आणि ते फोन कुणाच्या तरी वाढदिवसाच्या ‘ पार्टीला ’ जाण्यासाठी असतील तर  .  पुस्तकंप्रेमी हे जाण्याचं रद्द करून आपल्या पुस्तकात गढून जाणे पसंद करेल . तो पुस्तकात इतका गुंतलेला असतो की त्याला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो .  ,एखादी कादंबरी वाचत बसलेला असताना जर त्याला काही काम सांगितले असेल तर तो त्या कामाकडे दुर्लक्ष करेल किंवा ते काम उद्या वर तरी पुढे नेईल . अनेकदा वाचन प्रेमींना पुस्तकं वाचनाव्यक्तिरिक्त क...

पुस्तकांच्या दुकाना कधी सुरू होणार ?

Image
मार्च महिन्यापासून आपल्या देशात संपूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले , हा ब्लॉग लिहीत असेपर्यंत अजून तरी सगळ्या देशात लॉकडाउन आहे .  आणि पुढच्या काळात देखील लॉकडाउन काही काळासाठी वाढेल असा अंदाज आहे .  काही राज्य सरकारने तो लागू करावा म्हणून केंद्रसरकार कडे तशी मागणी ही केली आहे .  हा ब्लॉग लिहीत असेपर्यंत ५० दिवसांचा लॉकडाउन पूर्ण झाला आहे . आणि या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाना सोडून सर्व काही बंद होते .  आणि त्यात पुस्तकांची दुकानं ही आली . केंद्रसरकारने पुस्तकांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले होते .  त्यामुळे या काळात पुस्तकांची दुकानं पूर्णपणे बंद राहिली .  आणि त्याचा फटका पुस्तकवाचन करणाऱ्या वाचन प्रेमींना बसला .  गेल्या आठवड्यात दारूच्या दुकाना सुरू करण्याचा आदेश आला , आणि त्या सुरू ही झाल्या .  आपण दारू विकत घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या ही पाहिल्या . दारूच्या दुकानावर चर्चा ही खूप झाली .  दारू पासून किती महसूल मिळतो याची प्रचंड चर्चा झाली . दारूवरचे विनोद ही सोशल मीडियावर खूप गाजले . पण त्याच बरोबर वाचन प्रेमींनी मग पुस्...

पुस्तकांच्या किंमती आणि ग्रामीण भागात ग्रंथालय .

Image
          "  पुस्तकांच्या किंमती या वाढतच आहेत ,  माझ्या इतक्या कमी पगारात मी  पुस्तकं विकत घेऊ कशी ? ” अंकित .  अंकित ला पुस्तकं वाचण्याची लहान असल्यापासून  आवड होती , आणि अजून ही ती आहेच .   गेल्या वर्षी त्याला नोकरी लागली . ती नोकरी त्याला फार पगार देत नाही . आणि त्यात त्याच्या नोकरीचे ठिकाण हे ग्रामीण भागात आहे .  अशातच एखादी छोटी ‘ लायब्ररी ’ ही त्याच्या गावात नाही . अशी एखादी ‘ लायब्ररी ’  गावात उपलब्ध असती तर त्याला ती ‘  जॉईन ’ करता आली असती . म्हणजे त्याला अनेक पुस्तकं वाचता आली असती . पण गावात तर लायब्ररी नाहीच पण आसपास च्या गावात ही लायब्ररी नाही .  त्याच्या बोलण्यातून आणखी एक गोष्ट जाणवली गावात सर्व काही उपलब्ध आहे पण पुस्तकांचं दुकान नाही आणि ‘ लायब्ररी ’ नाही .  हल्ली ‘ ऑनलाईन ’  चा जमाना आहे , अनेक पुस्तकं ही ‘ ऑनलाईन ‘  ही तो वाचू शकतो . पण त्याला ‘ ऑनलाईन ’  पुस्तकं वाचू वाटत नाहीत ,  ‘ जुनं ते सोनं ’ असे त्याचे म्हणणे आले यावर . ‘ ऑनलाईन ’  मुळे डोळ्यांना त्रास होतो...

जसे जमेल आणि जिथे जमेल तिथे वाचन करा . पण आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा ही आनंद घ्या.

Image
पुस्तक वाचनाची बैठक / सवय ही  प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते , आणि तशी ती असतेही .  काहींना  सकाळी – सकाळी उठून पुस्तक वाचू वाटते तर काहींना रात्री झोपायच्या अगोदर पुस्तक वाचायला लागते .   म्हणजे ते लागतेच .  काहींना प्रवास करताना पुस्तक वाचायला आवडते . तर काही जण  असे ही असतात जे टॉयलेट मध्ये कमोड वर बसून पुस्तक वाचून काढतात . अर्थात ही प्रोसेस भयानक आहे .  या पद्धतीने तुम्ही  वाचत असाल तर तुमच्या पचन संस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो . पोट साफ न  होण्याची समस्याच तुम्हाला होऊ शकते .  अनेक मोटीवेशनल वक्ते असे म्हणतात की जी मोठी लोक आहेत म्हणजे मोठ्या कंपनीचे  मालक आहेत किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्यांना सकाळी पुस्तकं वाचायची सवय असते .  सकाळी व्यायाम झाला की थोड्या वेळ ते पुस्तक वाचतात व त्यानंतर कामावर हजर होतात .  ही सवय चांगली मानली जाते , तुम्ही सकाळी पुस्तक वाचत असाल तर तुम्ही दिवसभर ‘ फ्रेश ’ राहता .  जसे शरीरासाठी सकाळी व्यायाम आवश्यक असतो , आणि तो रोज केला तर तुम्हाला किती फ्रेश वाटते याचा अनुभव तुम...

लॉकडाउन च्या काळात पुस्तकप्रेमी पुस्तक वाचनाकडे मोठ्या वळली ?

Image
...साधारण या वर्षांतील मार्च महिन्याच्या तिसऱ्या आणि  चौथ्या आठवड्यात लॉकडाउन जाहीर झाले , आणि कालांतराने ते तीन टप्प्यात वाढले .   हा काळ तसा तापदायक आणि घरात बसून राहायचा होता . सगळीकडे एक चर्चा सुरू होती आणि ती म्हणजे सगळे घरात बसा .  सुरुवातीला वाटले लॉकडाउन हे लवकर उठेल  पण नंतर ते वाढत गेले . आणि मग या काळात काय करायचे . म्हणून अनेक जण आपल्या जुन्या छंदा कडे वळले . तर काहींनी आपला छंद या काळात आणखी चांगल्या रीतीने जोपासला .  या अनेक छंदापैकी पुस्तक वाचन हा एक अनेक जणांचा छंद होता .  मग अनेक जणांनी आपल्या घरात असणारी पुस्तकं बाहेर काढली . त्यांना ऊन दिलं . आणि पुन्हा पुस्तकं वाचायला सुरुवात केली   काहींसाठी पुस्तकं वाचन करने हा प्रकार  नवीन होता .मग त्यांनीही पुस्तक हातात घेतले .  हे सगळं होत असताना अनेक जण पुस्तकाबद्दल चर्चा करू लागले , काहींनी फेसबुक किंवा इतर काही अँप्स वर पुस्तकातील कोणत्या गोष्टी आवडल्या त्याबद्दल ही पोस्ट करायला सुरुवात केले .  आणि बघता – बघता पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वाढत गेली . ती इतकी वाढली की प...

ट्विटर - यांनी जग बदललं - लेखक - अतुल कहाते .

Image
ट्विटर  – यांनी जग बदललं - लेखक – अतुल कहाते - मनोविकास प्रकाशन . संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या १४० शब्दांची रचना  असलेल्या ट्विटर ची ही गोष्ट आहे . आता साधारण सगळ्यांना ट्विटर बद्दल माहिती झाले असेल आणि त्याची काय किमया आहे याची ही सर्वांना जाणीव असेल . ट्विटर हे एक सोशल अँप आहे , त्याच्या सोबतीला फेसबुक किंवा व्हाट्सअप्प हे सुध्दा सोशल अँप आहेत . पण जी कमाल ट्विटर करू शकते ते इतर अँप नाही करू शकत . आपलं मत किंवा एखादा संदेश जर कुणापर्यंत पोहचायचे असेल तर अवघी १४० शब्द आपल्याला भेटतात . आणि तीच १४० शब्द कमाल करतात .  ट्विटर चा  वापर आजच्या घडीला काही कोट्यवधी लोक करत असतील , करत आहेत .  पण ट्विटर चा जन्म हा काही सरळ झालेला नाही . त्याची कहाणी ही खूप रंजक आहे . ती एखाद्या सिनेमा सारखी वाटते . कारण जे कुणी याचे संस्थापक होते त्यांची च हक्कालपट्टी या कंपनीतुन पुढे जाऊन करण्यात आली होती . ट्विटर ची मूळ संकल्पना ही नोआ ग्लास व जॅक डॉसी च्या डोक्यात साकारली . आणि मग नोआ ने इव्हान उर्फ इव्ह ला यात गुंतवणूक करण्यासाठी आग्रह केला . इव्ह ने अगोदर ब्लॉगर...