Posts

जुने ते सोने..

90 च्या दशकातील गाण्यांनी माझ्या पिढीला प्रचंड भुरळ घातलेली आहे .आज ही गाणी कानावर पडली की मन एका क्षणात त्या काळात जाते. तो काळ आठवायला लागतो , मग त्या काळातील गंमती जमंती सगळचं आठवते .काल प्रवासात या दशकातील काही गाणी कानावर पडली .रात्री घरी आल्यावर you tube ओपन करून मनमुराद पन्नास च्या आसपास गाणी ऐकली .मन अक्षरशः भरून आले. त्या काळी माझ्या पिढीला कुठुन तरी गाणी ऐकायला यायची.मिळायची .ट्रॅक्टर ला गाणी लाऊन कुणी तरी ट्रॅक्टर पळवायचा .  सत्यनारायण झाले की लोक  गाणी लावायची . गणपती मंडळे दिवसभर गाणे वाजवायची . कमांडर जीप  मध्ये तर ही गाणी मस्ट होती . टेम्पो ड्रायव्हर टेम्पो मध्ये गाणे वाजवायचे . छायागीत , रंगोली,चित्रहार आठवड्यातून एकदा एकदा टीव्हीला यायचे.यू ट्यूब नसल्याने यावर अवलंबून रहावे लागायचे.पण त्यात वेगळीच मजा होती. याच दशकात घरोघरी टीव्ही दिसायला लागला.पुढे टेपरेकॉर्डर आला.कॅसेट आणून गाणी ऐकायची मजाच वेगळी होती .कॅसेट भरून आणल्या जायच्या .त्या ऐकल्या जायच्या.एकमेकांना दिल्या जायच्या. आज सगळे सोर्स उपलब्ध असताना एका क्लिक वर कुठलेही गाणे कुठे ही बसून ऐकता येते .तर...

चला या नव्या वर्षात १०० पुस्तकं वाचूया ...

Image
अनेक जणांना पुस्तक वाचायचे असते , महिनाकाठी चांगली आठ - दहा पुस्तकं वाचायची असतात .  पण त्यासाठी वेळ नसतो . माझ्याकडे वेळ नाही म्हणून अनेक जण पुस्तक हातात घ्यायचे टाळतात . हे हातात घेणे टाळणे म्हणजे पुस्तक वाचनापासून दूर जाणे , अगोदर हातात पुस्तक घेणे गरजेचे आहे .  या पृथ्वीवर सर्वांना समान म्हणजे 24 तासच उपलब्ध आहेत , कुणाला जास्त किंवा कमी वेळ मिळत नाही , बिल गेट्स जेव्हा वर्षाला 50 च्या वर पुस्तक वाचतात तेव्हा त्यांना ही 24 तास उपलब्ध असतात .  आणि आपल्याला ही 24 तास उपलब्ध असतात .  आपल्या पेक्षा त्यांना निश्चित जास्त काम आहे , ते निश्चितच आपल्यापेक्षा बिजी आहेत .  मग हे त्यांना कसे जमते ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे .   वेळ काढून पुस्तकं वाचावी लागतात  , मग त्यासाठी लवकर उठणे , सकाळीच थोडे पुस्तक वाचून कामाला बाहेर जाणे , दुपारच्या वेळी थोडा वेळ असेल तर त्यावेळेस हातात पुस्तक घेऊन वाचायला बसने .  रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल ची स्क्रिन डोळ्यापुढे धरण्यापेक्षा पुस्तकाची पाने डोळ्यापुढे घेऊन बसने गरजेचे आहे .  तुम्ही एवढे ही करू शकलात तर दि...

वाचावीत अशी पुस्तके - भाग -१ ......

   छत्रपती शिवाजी महाराज - चरित्र छत्रपती संभाजी महाराज - चरित्र महात्मा फुले  -चरित्र डॉ बाबासाहेब आंबेडकर -  चरित्र नेपोलियन बोनापार्ट  पंडित जवाहरलाल नेहरू डॉ. अब्दुल कलाम  स्वामी विवेकानंद कार्ल मार्क्स मार्टिन ल्युथर किंग  डॉ.नेल्सन मंडेला  सुभाषचंद्र बोस  _________________  The first 20 hours  How to think like Leonardo da Vinci  How to win friends and influence people Ikigai Jugar innovation Made to stick Million dollar habits Rework Retire young retire rich  The 4 hours work week The 48 laws of power The millionaire fast lane The power of habit The richest man in Babylon The tatas  Think and grow rich  Start with why  The 7 habits of highly effective people  Personal MBA  Zero to one  Lean in  Chanakya niti  Deep work  Rich dad poor dad  The 80/20 formula  The art of public speaking  _________________________________ Big magic  Emotional intelligence ...

मजेत जगा आणि आनंदाने काम करा .. .

Image
How to enjoy your life and your job ...               या पुस्तकाचा मराठी अनुवाद.  मजेत जगा आणि आनंदाने काम करा. लेखक - डेल कार्नेगी मजेत जगा आणि आनंदाने काम करा. हे पुस्तक  गृहिणी पासून ते अब्जाधीश लोकांच्या प्रोत्साहित करणाऱ्या गोष्टी सांगते . या पुस्तकांमध्ये सामान्य घरातील लोक ते थेट अब्जाधीश अशा लोकांच्या गोष्टी , अनुभव त्यांच्या आयुष्यात आलेल्या समस्या , नैराश्य त्यांना आलेला  थकवा आणि कंटाळा यावर यावर या लोकांनी कसा विजय या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल . या पुस्तकाचे एकूण चार भाग आहेत. पहिल्या भागामध्ये  भाग-1 -  आनंद आणि शांती मिळवण्याची सात मार्ग  1   स्वतःला ओळखा आणि त्याचा अभिमान बाळगा 2  थकवा आणि चिंता टाळणाऱ्या चार चांगल्या सवयी  3  तुम्हाला थकवा का येतो आणि त्याव  रील उपाय . 4  थकवा काळजी आणि रागाची निर्मिती करणाऱ्या कंटाळला कसे पळून लावाल.  5  तुमची बलस्थाने तुम्ही लाख रुपयांना कधी विकाल का?  6   कसे दुर्लक्ष करावे हे करा टीका तुम्हाला दुखावणा...

पुस्तकं वाचण्यासाठी तुमच्याकडे कारणं नसली पाहिजेत ....

Image
  आयुष्यात तुम्हाला खूप खूप पुस्तकं वाचायची असतात , इतर कुणी मित्र , किंवा फेसबुकवरचा  मित्र आणि त्याचे पुस्तक वाचून झाल्यावर त्याने पुस्तकाबद्दल फोटो पोस्ट केला किंवा कुणी तरी तुम्हाला अमुक तमुक पुस्तक वाच म्हणून सांगितले तर तुम्हाला ते पुस्तक वाचू वाटते .  पण खरी अडचण यापुढे येते . तुम्ही अनेक कारणं सांगत राहता आणि तेच काय पण कोणतंच पुस्तकं वाचत नाही . असे काही दिवस किंवा वर्ष निघून जातात तुम्ही एक पण पुस्तक वाचत नाहीत .  या काळात ज्याला आवड असते , त्याला सवड असते . असं म्हणत तुमचा एखादा मित्र या काळात प्रचंड पुस्तकं वाचून काढतो .  ही गोष्ट तुम्ही ही करू शकला असता , पण तुम्ही फक्त बहाणे शोधत राहता .  तुम्हाला कुणी विचारले  तुमचे तर पहिलं उत्तर असते , मला वेळच मिळत नाही .  जगातील एक श्रीमंत माणूस बिल गेट्स जेव्हा वर्षाला ५०-५५ पुस्तकं वाचून काढतो तेव्हा त्याला मिळालेले २४ तास हे आपल्याला पण मिळालेले असतात . किंबहुना या पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक माणूस हा २४ तास किंवा २४ तासाचा एक दिवस घेऊन येत असतो .  तो त्यापुढे कधी ही कमी किंवा जास्त होत न...

पुस्तकं का वाचतो , या प्रश्नाचे नाही उत्तर .

Image
काही वर्षांपूर्वी ची गोष्ट असेल मला नेहमी एक प्रश्न विचारला जायचा , आणि तो प्रश्न असा होता की  तुला हे पुस्तकं वाचून काय मिळते ?  खरंतर हा प्रश्न मला कधीच पडला नाही , आणि का पडावा हाही प्रश्नच होताच .  पुस्तकांची आणि माझी गाठ सोळा  वर्षांपूर्वी पडली ,माझे एक मित्र होते वयाने मोठे होते . पण माझं आणि त्यांचं जमायचं .  मी त्या वेळी कॉलेज मध्ये शिकत होतो . माझ्याकडे वेळ ही होता .आणि या वेळेत काय करायचे म्हणून मी या मित्राकडून पुस्तक आणले . आणि ते वाचायचे म्हणून वाचले .  छोटेखानी पुस्तक होते हे पण मी लगेच वाचून काढले . आणि त्यानंतर मी पुस्तकं वाचतच गेलो .  पुस्तकं वाचून मला काय मिळाले याचे उत्तर माझ्याकडे  अजून तरी नाही .  पण तुम्ही  पुस्तकं वाचावीत तुम्हाला त्याचे उत्तर  मिळते का बघा . 

.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे

Image
.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे   धोनी नेमका घडला कसा ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी शोधायचा प्रयत्न केला आहे  . हे पुस्तक त्याचाच शोध घेते .  शेवटच्या दोन बॉल वर १२ धावा लागत असतील आणि त्या वेळेस त्याच्या मनाची अवस्था काय असेल ? तो काय विचार करत असेल . त्याच्या मनात किती काहूर माजले असेल .  हे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात . मोक्याच्या व कठीण समयी तो एवढा कसा कुल राहू शकतो . आपण त्याच्या सारखे का वागू शकत नाही . किंवा इतर खेळाडू धोनी सारखे का वागू शकत नाहीत . खरंतर या प्रश्नाचे उत्तर धोनीच देऊ शकतो . लेखिकेने ते शोधण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केला आहे . आणि बऱ्याच अंशी धोनी कडून ह्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली आहेत .  पुस्तक एकूण पाच भागात आहे .  ■ योग्य मनोभूमिका  ■ गोल  ■फॉलो द प्रोसेस  ■ अ पिसफुल वॉक होम  ■ टू बी द चोझन लीडर . ● यशोमार्गात जवळपास ७०% श्रेय मानसिक कोशल्याचं असतं .उरलेलं ३०% श्रेय उपजत आणि प्राप्त केलेल्या प्रतिभेचं असतं .  ●  आयुष्य जर सरळ आणि साधं असेल तर त्यात गुंतागुंत  कशाला  करायची...