Posts

Showing posts from May, 2025

जुने ते सोने..

90 च्या दशकातील गाण्यांनी माझ्या पिढीला प्रचंड भुरळ घातलेली आहे .आज ही गाणी कानावर पडली की मन एका क्षणात त्या काळात जाते. तो काळ आठवायला लागतो , मग त्या काळातील गंमती जमंती सगळचं आठवते .काल प्रवासात या दशकातील काही गाणी कानावर पडली .रात्री घरी आल्यावर you tube ओपन करून मनमुराद पन्नास च्या आसपास गाणी ऐकली .मन अक्षरशः भरून आले. त्या काळी माझ्या पिढीला कुठुन तरी गाणी ऐकायला यायची.मिळायची .ट्रॅक्टर ला गाणी लाऊन कुणी तरी ट्रॅक्टर पळवायचा .  सत्यनारायण झाले की लोक  गाणी लावायची . गणपती मंडळे दिवसभर गाणे वाजवायची . कमांडर जीप  मध्ये तर ही गाणी मस्ट होती . टेम्पो ड्रायव्हर टेम्पो मध्ये गाणे वाजवायचे . छायागीत , रंगोली,चित्रहार आठवड्यातून एकदा एकदा टीव्हीला यायचे.यू ट्यूब नसल्याने यावर अवलंबून रहावे लागायचे.पण त्यात वेगळीच मजा होती. याच दशकात घरोघरी टीव्ही दिसायला लागला.पुढे टेपरेकॉर्डर आला.कॅसेट आणून गाणी ऐकायची मजाच वेगळी होती .कॅसेट भरून आणल्या जायच्या .त्या ऐकल्या जायच्या.एकमेकांना दिल्या जायच्या. आज सगळे सोर्स उपलब्ध असताना एका क्लिक वर कुठलेही गाणे कुठे ही बसून ऐकता येते .तर...