चला या नव्या वर्षात १०० पुस्तकं वाचूया ...
अनेक जणांना पुस्तक वाचायचे असते , महिनाकाठी चांगली आठ - दहा पुस्तकं वाचायची असतात . पण त्यासाठी वेळ नसतो . माझ्याकडे वेळ नाही म्हणून अनेक जण पुस्तक हातात घ्यायचे टाळतात . हे हातात घेणे टाळणे म्हणजे पुस्तक वाचनापासून दूर जाणे , अगोदर हातात पुस्तक घेणे गरजेचे आहे . या पृथ्वीवर सर्वांना समान म्हणजे 24 तासच उपलब्ध आहेत , कुणाला जास्त किंवा कमी वेळ मिळत नाही , बिल गेट्स जेव्हा वर्षाला 50 च्या वर पुस्तक वाचतात तेव्हा त्यांना ही 24 तास उपलब्ध असतात . आणि आपल्याला ही 24 तास उपलब्ध असतात . आपल्या पेक्षा त्यांना निश्चित जास्त काम आहे , ते निश्चितच आपल्यापेक्षा बिजी आहेत . मग हे त्यांना कसे जमते ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे . वेळ काढून पुस्तकं वाचावी लागतात , मग त्यासाठी लवकर उठणे , सकाळीच थोडे पुस्तक वाचून कामाला बाहेर जाणे , दुपारच्या वेळी थोडा वेळ असेल तर त्यावेळेस हातात पुस्तक घेऊन वाचायला बसने . रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल ची स्क्रिन डोळ्यापुढे धरण्यापेक्षा पुस्तकाची पाने डोळ्यापुढे घेऊन बसने गरजेचे आहे . तुम्ही एवढे ही करू शकलात तर दि...