Posts

Showing posts from July, 2020

.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे

Image
.थिंक अँड विन लाईक धोनी – स्फूर्ती सहारे   धोनी नेमका घडला कसा ? या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी शोधायचा प्रयत्न केला आहे  . हे पुस्तक त्याचाच शोध घेते .  शेवटच्या दोन बॉल वर १२ धावा लागत असतील आणि त्या वेळेस त्याच्या मनाची अवस्था काय असेल ? तो काय विचार करत असेल . त्याच्या मनात किती काहूर माजले असेल .  हे प्रश्न आपल्याला सुद्धा पडतात . मोक्याच्या व कठीण समयी तो एवढा कसा कुल राहू शकतो . आपण त्याच्या सारखे का वागू शकत नाही . किंवा इतर खेळाडू धोनी सारखे का वागू शकत नाहीत . खरंतर या प्रश्नाचे उत्तर धोनीच देऊ शकतो . लेखिकेने ते शोधण्याचा निश्चित चांगला प्रयत्न केला आहे . आणि बऱ्याच अंशी धोनी कडून ह्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली आहेत .  पुस्तक एकूण पाच भागात आहे .  ■ योग्य मनोभूमिका  ■ गोल  ■फॉलो द प्रोसेस  ■ अ पिसफुल वॉक होम  ■ टू बी द चोझन लीडर . ● यशोमार्गात जवळपास ७०% श्रेय मानसिक कोशल्याचं असतं .उरलेलं ३०% श्रेय उपजत आणि प्राप्त केलेल्या प्रतिभेचं असतं .  ●  आयुष्य जर सरळ आणि साधं असेल तर त्यात गुंतागुंत  कशाला  करायची...