Posts

Showing posts from June, 2020

पु .ल .देशपांडे यांची पुस्तकं .

Image
उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे महाराष्ट्राचे भाई म्हणजेच पु . ल . देशपांडे .  यांच्या काही पुस्तकांची यादी खाली देत आहे .  आपण वेळ काढून ही पुस्तकं जरूर वाचावीत . अतिशय छान अशी ही पुस्तकं आहेत .  असा मी असा मी  खोगीर भरती  बटाट्याची चाळ  म्हैस  अंमलदार  अघळ पघळ  अपूर्वाई  दाद  उरलं सुरलं  एक झुंज वाऱ्याशी एका कोळियाने  काय वाट्टेल ते होईल  गणगोत गुण गाईन आवडी  गोळाबेरीज  जावे त्यांच्या देशा  ती फुलराणी नस्ती उठाठेव हसवणूक  पुरचुंडी   पूर्वरंग मराठी वाङमयाचा  इतिहास रविंद्रनाथ : तीन व्याख्याने रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग १  रेडिओवरील भाषणे आणि श्रुतिका भाग २  सुंदर मी होणार . वाऱ्यावरची वरात व्यक्ती आणि वल्ली सखाराम गटाने  आपुलकी .  इ. ... टीप - पुस्तकांची यादी इंटरनेट वरून घेतली आहे .

वाचाल तर वाचाल.

Image
हॅलो , कसे आहात ? पुस्तकं वाचता आहात ना ! अहो वाचलेच पाहिजे . हा तुम्हाला एखाद्या मालिकेतील साधर्म्य साधणारा सवांद वाटेल .  पण खरं सांगू का ? आम्ही – तुम्ही सर्वांनी पुस्तकं वाचली पाहिजेत . किती वाचली पाहिजेत . तुम्हाला जसा वेळ काढता येईल , तेवढी वाचली पाहिजेत . समजा तुम्ही एका महिन्याला एक पुस्तक वाचत असाल तर वर्षाला बारा पुस्तकं वाचून होतील . आणि समजा तुम्ही अगदीच वेळ काढला आणि महिन्याला पाच पुस्तकं वाचली तर वर्षाला साठ पुस्तकं तुम्ही वाचू शकता . म्हणजे तुम्ही थेट बिल गेट्स च्या पंक्तीत जाऊन बसाल .  हो , बिल गेट्स च्या पंक्तीत . बिल गेट्स वर्षाला साधारण पन्नास ते साठ पुस्तकं वाचतात .  आता तुम्हाला पुन्हा प्रश्न पडेल बिल गेट्स यांना  पुस्तकं वाचायला वेळ कसा मिळेल ?  , या माणसाला पुस्तकं वाचनासाठी वेळ मिळणे एकदम दुरापास्त आहे . तुम्ही काही तरी चुकीचे सांगत आहात . नाही हे खरे आहे . तुम्हाला तसे वाटेल . वाटले तर तुम्ही गुगल ला शोधा ? गुगल तर चुकीची माहिती देणार नाही . गेल्या काही वर्षातील वृत्तपत्रातील बातम्या जर तुम्हाला सापडल्या तर त्या शोधा . म्हणजे तुम्हाला पट...