पुस्तकं का वाचतो , या प्रश्नाचे नाही उत्तर .
काही वर्षांपूर्वी ची गोष्ट असेल मला नेहमी एक प्रश्न विचारला जायचा , आणि तो प्रश्न असा होता की तुला हे पुस्तकं वाचून काय मिळते ? खरंतर हा प्रश्न मला कधीच पडला नाही , आणि का पडावा हाही प्रश्नच होताच . पुस्तकांची आणि माझी गाठ सोळा वर्षांपूर्वी पडली ,माझे एक मित्र होते वयाने मोठे होते . पण माझं आणि त्यांचं जमायचं . मी त्या वेळी कॉलेज मध्ये शिकत होतो . माझ्याकडे वेळ ही होता .आणि या वेळेत काय करायचे म्हणून मी या मित्राकडून पुस्तक आणले . आणि ते वाचायचे म्हणून वाचले . छोटेखानी पुस्तक होते हे पण मी लगेच वाचून काढले . आणि त्यानंतर मी पुस्तकं वाचतच गेलो . पुस्तकं वाचून मला काय मिळाले याचे उत्तर माझ्याकडे अजून तरी नाही . पण तुम्ही पुस्तकं वाचावीत तुम्हाला त्याचे उत्तर मिळते का बघा .